खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात एक खासगी विधेयक सादर केलं आहे. त्यानुसार देशभरात विविध निवडणुकांसाठी वेगवगेळ्या वयोमर्यादा आहेत. वयोमर्यादा कमी करुन युवकांना संधी दिली जावी, अशी ओवेसी यांची मागणी आहे. असदुद्दीन ओवेसी यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी २० वर्ष पूर्ण ही अट असावी अशी मागणी केली आहे.
आपल्या देशातील ५३ टक्के लोकसंख्या २५ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील आहे. मात्र, तरी देखील त्यांना राजकीय यंत्रणेपासून बाहेर ठेवत आलो आहोत. असदुद्दीन ओवेसी यांनी यासंदर्भात लोकसभेत खासगी विधेयक सादर केलं आहे. त्यानुसार लोकसभा, विधानपरिषद, राज्यसभा निवडणूक बनण्यासाठीची वयोमर्यादा कमी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. लोकसभेसाठी २० वर्ष पूर्ण, राज्यसभेसाठी २५ आणि विधानपरिषदेसाठी २२ वर्ष पूर्ण असावीत, अशी अट असली पाहिजे, असं ओवेसी यांनी लोकसभेत मांडलं. ओवेसी यांनी याबाबत एक व्हिडिओ देखील ट्विट केला आहे.
भाजपचा विरोध
भारतीय जनता पार्टींनं असदुद्दीन ओवेसींच्या खासगी विधेयकाला विरोध केला आहे. यावरुन ओवेसींनी देखील भाजप खासदारांवर प्रश्नांची सरबत्ती केली. युवा खासदारांची पार्टी म्हणून घेणाऱ्या पक्षाचा या विधेयकाला विरोध का?, असा प्रश्न ओवेसींनी केला.