कोल्हापूर:कॉम्रेड गोविंद पानसरे (comrade govind pansare) यांच्या हत्याप्रकरणी सुनावणी आज जिल्हा सत्र न्यायालयात पार पडली असून २७ जुलै रोजी झालेल्या दोष निश्चिती सुनावणी वेळी सर्व संशयित आरोपींना उपस्थित राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार आजच्या सुनावणीसाठी सारंग अकोलकर, विनय पवार वगळता सर्व आरोपी न्यायालयात आज हजर होते. या प्रकरणावरील सुनावणी दिनांक पाच ऑगस्ट म्हणजेच शुक्रवारी घेण्यात येणार असल्याचे न्यायालयाने सांगितले होते. त्यानुसार आज सुनावणी पार पडली. मात्र, या दरम्यान पानसरे हत्येचा तपास एटीएसकडे वर्ग केला आहे. त्याची ऑर्डर न्यायालयाकडून प्राप्त झालेली नाही. त्यामुळे सुनावणी पुढे ढकलावी अशी सरकार पक्षातर्फे मागणी करण्यात आली. त्यास आरोपींच्या वकिलांनी ही त्यास हरकत घेतली नाही. त्यामुळे पुढील सुनावणी २३ ऑगस्टला होणार आहे. (The next hearing on Comrade Govind Pansare murder case will be held on August 23)

तपास एटीएसकडे वर्ग केल्याने सुनावणी पुढे ढकलली

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला सात वर्षे पूर्ण झाली पानसरे हत्‍येचा तपास सीआयडीच्‍या विशेष तपास पथक करत आहे. मात्र गेली सात वर्षात मारेकरी अद्यापही हाती लागलेले नाहीत. यामुळे या प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपविण्‍यात यावा अशी मागणी असणारी याचिका पानसरे कुटुंबियांनी उच्‍च न्‍यायालयात दाखल केली होती. यावर उच्‍च न्‍यायालयाच्‍या दोन सदस्‍यीय खंडपीठासमोर मंगळवारी सुनावणी झाली.

फटाके, फुलांचा वर्षाव, बोनेटवर चढून स्टंटबाजी; कोल्हापुरात आरोपीचं झालं असं जंगी स्वागत!
यावेळी एटीएसकडे तपास सोपविण्‍यास आमची हरकत नाही असे सीआयडीच्‍या वतीने ज्‍येष्‍ठ वकील अशोक मुंदरगी यांनी काल सुनावणीवेळी स्‍पष्‍ट केले हाेते. यानंतर आज पानसरे कुटुंबीयांची मागणी मान्‍य करत न्‍यायालयाने तपास एटीएसकडे वर्ग करण्‍याचा आदेश देण्यात आला मात्र या आदेशाची ऑर्डर अद्याप न्यायालयाकडून प्राप्त झाले नसल्याने ही 23 ऑगस्ट रोजी होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १० कोटी द्या, अन्यथा जिल्हाबंदी करू; शिवसेनेचा इशारा
२३ ऑगस्टला पुढील सुनावणी

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणी २७ जुलै रोजी झालेल्या दोष निश्चिती सुनावणीवेळी सर्व संशयित आरोपी उपस्थित नसल्याने सुनावणी पुढे ढकलली गेली होती आणि सर्व संशयित आरोपींना हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते तसेच पुढील सुनावणी ही पाच ऑगस्ट रोजी होणार असे सांगण्यात आले होते त्यानुसार आज याबाबत सुनावणी होती. मात्र न्यायालयाने पुन्हा ही सुनावणी पुढे ढकलली.

संभाजीराजे मैदानात, ९ ऑगस्ट पासून परिवर्तन यात्रा, राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघणार
मागील सुनावणीस संशयित विरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर व समीर गायकवाड हे उपस्थित होते. तर इतर सहाजण अनुपस्थित राहिले. आजच्या सुनावणीस सारंग अकोलकर, विनय पवार वगळता सर्व आरोपी न्यायालयात आज हजर होते. मात्र आता पुढील सुनावणी हे २३ ऑगस्ट रोजी होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here