man committed suicide by jumping into the river: गुजरातमध्ये पत्नी अत्याचार विरोधी संघटना स्थापन करून त्रस्त पतींचा आवाज बनणाऱ्या आणि त्यांची मदत करणाऱ्या दशरथ देवडा यांचे भाचे किरीट देवडा यांनी आत्महत्या केली. या आत्महत्या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे.

पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या
मंजू नेहमी किरीट यांच्या आई, वडिलांशी वाद घालायची. त्यांना खोट्या खटल्यांमध्ये गोवण्याची धमकी द्यायची. किरीट यांनी आत्महत्या करण्याच्या एक दिवस आधी मंजूनं किरीट यांना झाडूनं सगळ्यांसमोर मारहाण केली होती. केर काढण्यावरून वाद झाल्यानंतर मंजूनं सर्वांसमोर किरीट यांना झाडूनं मारलं.
दुसऱ्या दिवशी किरीट यांचा मृतदेह साबरमती नदीत सापडला. पोलिसांना किरीट यांच्या खिशात मोबाईल आढळून आला. त्यात एक व्हिडीओ होता. मी आयुष्याला कंटाळलो आहे. त्यामुळे आत्महत्या करत आहे. यासाठी माझी पत्नी जबाबदार आहे. यानंतर पोलिसांनी मंजूविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.