संतोषचं उत्तर ऐकून वडील संतापले. त्यांच्यामध्ये कडाक्याचं भांडण झालं. त्याचवेळी मोती यांचा भाऊ रामकिशन तिथे पोहोचला. मोती यांनी रामकिशन यांच्या मदतीनं संतोषला मारहाण करण्यास सुरुवात केली. वडील आणि काकांनी मारल्यानंतरही संतोषनं बाईकची चावी देण्यास नकार दिला.
मोती यांनी कुऱ्हाडीनं मुलावर हल्ला केला. त्यात संतोषचा डावा हात शरीरापासून वेगळा झाला. संतोष वेदनेनं विव्हळू लागला. त्यानंतर मोती यांनी संतोषचा हात आणि कुऱ्हाड घेऊन पोलीस ठाणं गाठलं. त्यांनी स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केलं. पोलीस घरी पोहोचले तेव्हा संतोष वेदनेमुळे कण्हत होता. सध्या त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वडील आणि मुलामध्ये याआधीही वाद झाला होता. मोती यांच्याकडे ५ एकर जमीन आहे. त्यावर दोघे मिळून शेती करतात. शेतातलं गवत कापण्यावरुनही दोघांमध्ये भांडण झालं होतं. संतोषनं बाईक खरेदी केली. मात्र हप्ता वेळेवर भरता येत नसल्यानं तो चिंतेत होता. त्यानं वडिलांकडे आर्थिक मदत मागितली होती. मात्र वडिलांनी त्यांच्याकडे पैसे नसल्याचं सांगितलं.