पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एस टी बस स्टँड आजपासून बंद झाले झाले आहेत. शिवाजीनगर बस स्थानक आहे त्या ठिकाणी मेट्रो आणि एस टी बस स्थानक अशी एकत्र भव्य इमारत बांधण्याचे काम चालू असल्यामुळे हा तात्पुरता बदल करण्यात आला आहे. आता हे बसस्थानक खडकी भागातील बजाज उद्यानाजवळ हलवण्यात आले आहेत. आता पुढील 4 ते 5 वर्षे खडकीमध्ये हे बसस्थानक असणार आहे.

दरम्यान, शिवाजीनगर बसस्थानक खडकीत हलवल्यानं येथे जाण्यायेण्यासाठी जास्तीचा वेळ खर्ची पडणार आहे. तसेच या स्थानकावर येण्या जाण्याचा खर्चही वाढणार आहे. दरम्यान, प्रवाशांसाठी लवकरच या खडकीतील बसस्थानकापर्यंत पुणे सीटी बससेवा सुरु केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here