हर हर शंभू या गाण्यामुळे फरमानी नाज चर्चेत आहे. हे गाणं गायल्यामुळे मुस्लिम समाज तिच्याविरोधात उभा ठाकला आहे. तर दुसरीकडे फरमानी नाज हिला एक संधी चालून आली आहे. लवकरच ती बिग बॉस १६ या सीझनमध्ये दिसणार आहे. या शोचा होस्ट सलमान खानकडूनच ही ऑफर केल्याची चर्चा आहे.

हायलाइट्स:
- गायिका फरमानी नाजला बिग बॉस १६ची ऑफर
- हर हर शंभू गाण्यामुळे झाली लोकप्रिय
- मुस्लिम असून हे गाणं गायल्याने मुस्लिम समाजाचा रोष
माधुरी दीक्षित आणि मलाइकाच्या लेकांचीही करण जोहरच्या सिनेमात महत्त्वाची भूमिका!
अभिलाषा पांडा हिने गायलेले हर हर शंभू गाणं आपल्या आवाजात म्हणणार फरमानी इंडियन आयडॉलमध्येही दिसली होती. आता तिच्याबाबतीत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. लवकरच ती बिग बॉस १६ या सीझनमध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे सलमानकडूनच फरमानीला ही ऑफर मिळाली असल्याचं बोललं जात आहे. फरमानीविरोधातील वाद अजूनही सुरूच आहे. मुस्लिम समाजाने फरमानीने हे गाणं गायल्याबद्दल फतवा काढला आहे. मुस्लिमांच्या विरोधाला कंटाळून फरमानी हिंदू धर्म स्वीकारणार असल्याच्याही बातम्या धडकत आहेत, पण सध्या तरी ही अफवा आहे.
बिग बॉसमध्ये येण्याची ऑफर आल्याची बातमी आहे, पण फरमानीच्या बहिणीच्या म्हणण्यानुसार, फरमानी अजूनही या ऑफरला स्वीकारायचे की नाही याचा विचार करत आहे. बिग बॉसमध्ये जाण्यासाठी ती घाबरत आहे कारण या शोमध्ये होणारा वाद, भांडण तिला आवडत नाही. तसेच रिअॅलिटी शो कलाकारांचा फायदा घेतं, त्यांना कोणतीही मदत करत नाही. यापूर्वी ती इंडियन आयडॉलमध्ये सहभागी झाली होती पण मुलाच्या आजारपणामुळे तिला हा शो मधूनच सोडावा लागला.
फरमानीचा जीवनप्रवास खूपच वेदनांनी भरलेला आहे. तिच्या पतीने तिला तलाक न देताच दुसरं लग्न केलं आहे. तर सासरच्या लोकांनी तिला घराबाहेर काढलं तसेच याविषयी काहीही बोललीस तर जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान गाण्याची आवड असलेल्या फरमानीने तिचं यूट्यूब चॅनेल सुरू केलं. तिचे तीन मिलीयन्स फॉलोअर्स आहेत.
‘आई कुठे काय करते’मध्ये मंगळागौर साजरी
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.