मुंबई: देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. केंद्र सरकारनं आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. घर घर तिरंगा मोहिमेला सुरुवात झाली आहे. सगळ्यांनी आपल्या व्हॉट्स ऍप, फेसबुक, ट्विटर डीपीवर तिरंगा ठेवावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून करण्यात आलं. त्यानंतर अनेकांनी आपले डीपी बदलले. तिथे तिरंगा ठेवला. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं फेसबुक आणि ट्विटरवर आपला डीपी बदललेला नाही. तिथे संघाचा भगवा ध्वज कायम आहे. त्यामुळे काँग्रेससह विरोधकांनी संघाला लक्ष्य केलं आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका होत असाताना आता सरसंघचालकांनी तिरंगा आणि संघाचं नातं सांगितलं आहे. तिरंगा झेंडा जन्माला आल्यापासू संघ त्याच्यासोबत ठामपणे उभा असल्याचं भागवत म्हणाले. फैजपूरमध्ये झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात तिरंगा फडकवण्यात आला. त्यावेळी ध्वजस्तंभ ८० फूट उंचीचा होता, असं भागवतांनी सांगितलं.
तरुणांना २० व्या वर्षानंतर लोकसभा लढवू द्या, असदुद्दीन ओवसींचं संसदेत खासगी विधेयक
फैजपूरमध्ये काँग्रेसचं अधिवेशन झालं. पंडित नेहरू त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. त्यांच्या हस्ते तिरंगा फडकावला जाणार होता. पंडित नेहरूंनी तिरंगा फडकवण्यासाठी दोरी ओढली. पण तो ध्वज ८० फूट वरपर्यंत गेला नाही. तो मध्येच लटकू लागला. इतक्या उंचावरून जाऊन दोरीचा गुंता सोडवण्याचं धाडस कोणातच नव्हतं. त्यावेळी तिथे जमलेल्या गर्दीतून एक तरुण पुढे आला. तो सरसर खांबावर चढला. त्यानं गुंता सोडवला आणि राष्ट्रध्वज ८० फूट उंचीवर जाऊन फडकला, असं भागवत यांनी सांगितलं.
बायको सर्वांसमोर झाडूनं मारते! पतींच्या हक्कांसाठी लढणाऱ्या तरुणाची आत्महत्या; नदीत जीव दिला
पंडित नेहरूंनी त्या तरुणाचं कौतुक केलं. त्याची पाठ थोपटली. अधिवेशनात बोलावून तुझं अभिनंदन करू, सत्कार करू, असं नेहरू त्या तरुणाला म्हणाले. त्यावेळी नेहरूंना काही लोकांनी सांगितलं की त्याला बोलावू नका. तो शाखेत जातो. त्या तरुणाचं नाव किसनसिंग राजपूत. ते संघाचे स्वयंसेवक होते. जळगावातल्या फैजापूरमध्ये ते राहायचे. डॉ. हेडगेवार यांना जेव्हा ही गोष्ट समजली, तेव्हा ते स्वत: जळगावला गेले. त्यांनी राजपूत यांची भेट घेतली आणि त्यांना चांदीची लहानशी लोटी त्यांना भेट म्हणून दिली, असं भागवत म्हणाले.

शिवसेना संपत चालली आहे म्हणणाऱ्या जे पी नड्डांना उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here