सातारा : सातारा जिल्ह्यातील दत्तनगर-कोडोली येथे आज सकाळी धक्कादायक घटना घडली आहे. धाकट्या भावाने कुटुंबात झालेल्या भांडणाच्या कारणातून थोरल्या भावाच्या १० महिन्यांच्या बाळाला विहिरीत फेकल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने बाळाला दुकानात घेऊन जातो, असं सांगून सातारा-रहिमतपूर रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीमध्ये फेकून दिले. या कृत्याची माहिती आरोपी धाकट्या भावनेच थोरल्या भावाला फोन करून सांगितली.‌ ही माहिती देऊन तो घटनास्थळावरून पसार झाला. अक्षय मारुती सोनवणे असं संशयित आरोपीचं नाव असून सदर घटनेत लहानग्याचा मृत्यू झाला आहे.

शिंदे सरकार अब्दुल सत्तारांवर मेहरबान; नियमांना अपवाद करत कोट्यवधींचा निधी

या घटनेतील आरोपीला सातारा शहर व एमआयडीसी पोलिसांनी काही तासांतच अटक केली आहे. याबाबतचे वृत्त पसरताच दत्तनगर- कोडोली येथे खळबळ उडाली असून लहान मुलाच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. घरगुती वादाचा राग मनात धरून संशयित आरोपीने बाळाला चॉकलेट देतो असे सांगून घरातून बाहेर नेत हे कृत्य केलं असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, स्थानिकांच्या मदतीने विहिरीतून चिमुकल्याचा मृतदेह काढण्यात आला असून या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here