– प्रशांत श्रीमंदिलकर

शिरूर: शिरूर तालुक्यात काल ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. मात्र या निवडणुकीत सर्वात जास्त चर्चा झाली ती टाकळी हाजी ग्रामपंचायत निवडणुकीची. या परिसरात टाकळी हाजीसह माळवाडी, शरदवाडी, म्हसे, टाकळी हाजी या ग्रामपंचायतींवर घोडे गटाने वर्चस्व मिळवले. त्याला कारणही तसेच आहे. राष्ट्रवादीचे दामुशेठ घोडे हे किंगमेकर ठरले.

टाकळी हाजी ग्रामपंचायत निवडणूक प्रचारादरम्यान ही माझी निवडणूक नसून माझे लग्न आहे, असे विधान दामुशेठ घोडे यांनी प्रचारादरम्यान केले होते. या एका वाक्यावर त्यांनी ही निवडणूक जिंकली आहे. त्यानंतर त्यांनी औपचारिकता म्हणून आणि दिलेला शब्द पाळण्यासाठी पुन्हा लग्न करून पुन्हा शब्द पाळून दाखवला. विशेष म्हणजे या लग्न सोहळ्यासाठी सर्व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिंदे सरकार अब्दुल सत्तारांवर मेहरबान; नियमांना अपवाद करत कोट्यवधींचा निधी
निवडणूक प्रचाराच्या पहिल्याच सभेत दामुशेठ घोडे यांनी लोकांना भावनिक आवाहन केलं. ही निवडणूक नसून माझे लग्न आहे. मी चार नंबर प्रभागाचा नवरदेव आहे, तर एक नंबर प्रभागमधून अरूणाताई माझी नवरी असून, दोन नंबर प्रभागातील त्यांची उभी असलेली सुनबाई ही आमची करवली आहे. तुम्ही सर्वजण माझे वऱ्हाडी आहात आणि निकाल म्हणजेच माझे लग्न असेल, असं घोडे प्रचारादरम्यान म्हणाले होते.

निघोज कुंड येथील मंगल कार्यालयात हा अनोखा विवाह सोहळा पार पडला. निकाल लागल्यानंतर टाकळी हाजी येथील कुंड पर्यटन स्थळ येथील मंगल कार्यालयात जाऊन एक अनोखा विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याची चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.या दिमाखदार सोहळ्याची चर्चा शिरूर तालुक्यासह जिल्ह्यात सर्वत्र होत असून चक्क या विवाह सोहळ्यास घोडे दाम्पत्याचे सर्व कुटुंब उपस्थित होते.
उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना शिस्तीने वागायचे, मात्र….; नेमकं काय म्हणाले अजित पवार?
शिरूर तालुक्यात टाकळी हाजी येथे दामुशेठ घोडे आणि पोपटशेठ गावडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते. त्यांनी त्यांच्या प्रभागातून सलग पंधरा वर्षे निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा ठेवली होती. मात्र माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या सोबत राजकीय मतभेद झाले. त्यामुळे यंदाची निवडणूक पार पडली.

घोडे पाटील ठरले किंगमेकर
माळवाडी, म्हसे, शरदवाडी या ग्रामपंचायतींवर दामुशेठ घोडे हेच किंगमेकर ठरले आहेत. पाच ऑगस्ट रोजी निकाल लागल्यानंतर त्यांनी प्रत्यक्षात विवाह सोहळा पार पाडून आपला शब्द खरा करून दाखवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here