– अक्षय गवळी

अकोला: सध्याच्या युगात फेसबुकसह सोशल मीडियाचा अनेकदा गैरवापर होताना पाहायला मिळतो. मात्र, याचं फेसबुकच्या माध्यमातून एका तरुणाने आपल्या जीवनात अनेक बहिणी जोडल्या आहेत. गेल्या चार वर्षापासून हा तरुण आपल्या फेसबुक लिस्टमध्ये असणाऱ्या मुलींना-महिलांना न चुकता, राखी आणि भाऊबीज सणाला गिफ्टही पाठवतो. यंदाही फेसबुक लिस्टमध्ये असलेल्या सर्व मुली आणि महिलांना राखीचं गिफ्ट पाठवले आहे. या सर्व बहिणी राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील असून सर्वांना त्यांचं राखीचं गिफ्ट मिळालं आहे.

रामा कंजे असं या तरुणाचं नाव आहे. रामाचं वय ३० असून तो मूळचा लातूरचा आहे. रामाच्या फेसबुकवर आज अनेक तरुणी आणि माहिला जोडलेल्या आहेत. रामा फेसबुक लिस्टमध्ये असलेल्या तरुणी अथवा महिलांसोबत बोलण्याची सुरुवात ‘ताई’ या शब्दापासून करतो. तो सर्वांना बहिणी मानतो. एवढंच नव्हे तर भावाचं कर्तव्य म्हणून दरवर्षी रक्षाबंधन असो की भाऊबीज असो, न चुकता सर्वांना गिफ्ट पाठवतो. गेल्या चार वर्षापासून त्याचा हा उपक्रम सुरू आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी रामाने फेसबुकमध्ये असलेल्या फ्रेंड लिस्टमधील महिला आणि तरुणींना रक्षाबंधनाचे गिफ्ट म्हणून कंदील (दिवा), तर कुणाला कपडे पाठवले.
माता न तू वैरिणी: पोटच्या मुलीला आईनेचं संपवलं, मन हेलावून टाकणारी घटना
या बहिणींना पाठवल्या भेटवस्तू…
भक्ती जाधव (सोलापूर), सुचेता भिसे (पुणे), पूजा निचले (लातूर), अश्विनी आढव (नाशिक), पल्लवी भोसले (पुणे), सिमा राऊत पाटिल (नागपुर), सुबधा सरप पाटिल (नगर), शिवानी आदेकर (चिंच नगर, सोलापूर), वर्षा भांडे(अकोला), प्रिया बामानकर, कोमल पेठकर, श्वेता यादव, वैशाली लोंढे, पूजा निचले यासह अनेक बहिणींना रामाने भेटवस्तू पाठवल्या आहेत.

तीन वर्षांपासून मिळताहेत गिफ्ट्स
मी गेल्या तीन वर्षापासून रामाची फेसबुक फ्रेंड आहे. सलग ३ वर्षांपासून राम भाऊबीज-रक्षांबंधनाला मला गिफ्ट पाठवतोय. यंदा रक्षाबंधनाचं गिफ्ट म्हणून कंदील मिळालं आहे. आजच्या युगात असाही अनोळखी भाऊ मिळाला आहे, याचा आनंद आहे. गेल्या तीन वर्षात आमची कधीच भेट झाली नाही.
– अश्विनी संजय आढाऊ, जि. नाशिक.
या अँगलनं काढ! फोटोच्या नादात तरुण उंचावरून कोसळला; दगडांवर आदळत धबधब्यात पडला
इतरांनी आदर्श घ्यायला हवा
सध्याच्या युगात कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत आपण लगेच बोलत नाही. कारण त्याचा गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता जास्त असते. पण रामाचा स्वभाव वेगळा असल्याचं जाणवलं. गेल्या २ वर्षापासून मी त्याची फेसबुक फ्रेंड आहे. त्याचा पहिला शब्द ताई होता. तेव्हापासून मला राखी आणि भाऊबीज गिफ्ट येत आहे. यावेळीदेखील मला राखीचं गिफ्ट घरपोच आलंय. रामाचा आदर्श इतरांनी घ्यायला हवा..
– सीमा राऊत पाटील, नागपूर शहर.

छत्रपतींचा आदर्श ठेऊन काम करतोय
छत्रपती शिवाजी महाराज महिलांना नेहमीच आदर, माता म्हणून सन्मान करायचे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आज हे कार्य करत आहे. राज्यातील सर्व तरुणी माझ्या बहिणी आहेत, असे समजतो. माझ्या फेसबुकवर जोडलेल्या सर्व महिलांना राखीचं गिफ्ट म्हणून कंदील तर मुलींना भेटवस्तू पाठवल्या आहेत.
– रामा कंजे, लातूर.

संजय राऊतांविरोधात भाजपचं षडयंत्र, सुनिल राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here