नाशिकमध्ये द्वारका भागात मोठी आग लागली आहे. अग्निशमन दलाचे १० बंब घटनास्थळी पोहोचले आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेत तीन गंभीर झाल्याची माहिती आहे.

 

​fire in nashik

नाशिकमध्ये कबीरनगर झोपडपट्टीत भीषण आग, चार सिलिंडर्सचे स्फोट; तीन गंभीर जखमी

नाशिक : नाशिक शहरातील द्वारका परिसरात कबीरनगर झोपडपट्टीत भीषण आग लागली आहे. या घटनेत आतापर्यंत चार सिलिंडर्सचा स्फोट झाल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाच्या सर्व केंद्रांना अलर्ट देण्यात आला आहे. अग्निशमन दलाचे १० बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. यासोबत १०८ क्रमांकाच्या दोन रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.

नाशिकच्या द्वारका येथील आगीत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भीषण आगीमुळे आजूबाजूचे रहिवासी हे घरातील सिलिंडर घेऊन रस्त्यालागत बसले आहेत. आगीमुळे नागरिकांची धावाधाव सुरू आहे. खबरदारी म्हणून सारडा सर्कल, वडाळा नाका, द्वारकाकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत.

आदिवासींनी आदिवासींसाठी उभारले मेडिकल हब, देशातील पहिला वहिला प्रकल्प

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here