4 killed in a blast, नावेत जेवण बनवत होते, भूक लागली होती, काही कळायच्या आत झाला भीषण स्फोट; चौघे जागीच ठार – four lost lives in a cylinder blast in a boat while cooking in patna of bihar
पाटणा : सोन नदीत नावेत बसून जेवण तयार करत असताना अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट (Gas Cylinder Blast) होऊन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बिहारमधील पाटणा जिल्ह्याती मनेर येथे घडली. या नावेत प्रवास करत असलेले सर्वजण मजूर होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या स्फोटात अनेकजण गंभीररित्या भाजले आहेत. पोलिसांनी मृत मजुरांचे शव ताब्यात घेतले असून या घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे. (four lost lives in a cylinder blast in a boat while cooking in patna of bihar) या दुर्घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना भोजपूर आणि पाटणा जिल्ह्यांच्या सीमेवर झाला आहे. बिंदगावा गावाजवळ रामपूर वाळूघाटाजवळ काही लोक सोन नदीमध्ये नावेत जेवण तयार करत होते. त्याचवेळी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. एका क्षणात नावेत असलेले सर्वजण गंभीररित्या भाजले आणि त्यांचा तेथेच मृत्यू झाला.