अहमदनगर : कर्जतमध्ये युवकावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत सहा जणांना अटक केली आहे. भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्याने हा हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यासाठी शहर बंद ठेवून हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी करण्यात आली. पोलिसांनी तपासाला वेग दिला असून, ठोस पुरावे अद्याप मिळाले नसल्याचे सांगण्यात येते.

दोन दिवसांपूर्वी प्रतीक ऊर्फ सनी राजेंद्र पवार याच्यावर हल्ला झाला. अमित राजेंद्र माने यांच्यासोबत जात असताना टोळक्याने त्यांची दुचाकी अडवून लाकडी दांडक्यांनी मारहाण केली होती. यामध्ये प्रतीक गंभीर जखमी झाला. या प्रकरणात माने यांनी फिर्याद दिली. त्यानुसार शाहरुख खान पठाण, सोहेल खान पठाण, निहाल खान पठाण, इलाईल शेख, टिपू पठाण, अब्रार ऊर्फ अरबाज कासम पठाण, अर्षद पठाण, अकीब सय्यद यांच्यासह अन्य काही आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. प्रतीकने काही दिवसांपूर्वी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियात पोस्ट केल्याने हा हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच्या निषेधार्थ शुक्रवारी कर्जतमध्ये, तर शनिवारी राशीनमध्ये बंद पाळण्यात आला. हिंदुत्ववादी संघटनांसह भाजपच्या नेत्यांनी यामध्ये लक्ष घातले आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आज, रविवारी कर्जतला येणार आहेत.

विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मतदान करणाऱ्या काँग्रेस आमदारांची यादी तयार; मतफुटीचा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे

दोन गटांत पूर्वीही भांडणे झाल्याचे सांगण्यात येते. सुमारे दीड महिन्यांपूर्वी प्रतीक याच्याविरुद्ध जुनेद पठाण याला किरकोळ कारणातून मारहाण केल्याचा गुन्हा दाखल आहे. कर्जतच्या रथयात्रेच्या काळात पोलिसांनी प्रतीकवर प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. त्यानंतर तो शहरात दिसल्याने पठाण आणि त्याच्या साथीदारांनी त्याच्यावर हल्ला केला. पवार याने नुपूर शर्मा यांचे समर्थन केले म्हणून हा हल्ला झाल्याचा आरोप आहे. हे प्रकरण राज्यभर पोहोचल्याने पोलिसांनी कर्जत आणि राशीनमध्ये मोठा बंदोबस्त तैनात केला असून, अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. शर्मा यांच्या समर्थनाच्या कथित पोस्टचा शोध घेण्यासाठी प्रतीकच्या सोशल मीडिया अकाउंटची तपासणी सुरू असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here