वर्धा: जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील पांढुर्णा परिसरामध्ये नागपूरच्या पारडी येथील पती-पत्नीने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ निर्माण झाली आहे.

नागपूर जिल्ह्यातील पारडी येथील रहिवासी रामकृष्ण खडतकर (वय ६०) व त्यांची पत्नी शोभा रामकृष्ण खतकर (वय ५३) यांनी पांढुर्णा परिसरात विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. २७ जुलैपासून हे दाम्पत्य एमएच ४९ एटी ५७९६ क्रमांकाचे व्यावसायिक वाहन घेऊन भ्रमंती करत होते. शनिवारी ६ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास पांढुर्णा परिसरात रामकृष्ण खडतकर आणि शोभा खडतकर यांचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. घटनास्थळावरून विषारी द्रव्याचे ग्लास, बॉटल, पिशवी आदी साहित्य जप्त करण्यात आले.
बापानं कुऱ्हाडीनं लेकाचा हात तोडला; हात घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचला, कारण वाचून थरकाप उडेल
घटनेनंतर पोलिसांनी मिळालेल्या मोबाईल क्रमांकावरून मृतकाच्या मुलाशी संपर्क साधला. मृतक हे मूळचे पारडी नागपूर शहर येथील असल्याची माहिती मिळाली. ते गावोगावी जावून बाजाराच्या ठिकाणी चप्पल, बुट विक्रीचा व्यवसाय करायचे. २७ जुलै रोजी ते एमएमच ४९ ए टी ५७९६ क्रमांकाच्या वाहनात चप्पल बुट विक्रीसाठी घेऊन गेले होते. तेव्हापासून ते घरी परतले नव्हते. त्यांच्या मुलाने याबाबत नागपूर शहर पोलीस ठाण्यात मिसींगची तक्रार केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here