st bus driver commits suicide in dhule depot: एसटी बसमध्ये असलेल्या घंटी वाजवायच्या दोरीनं एका बस चालकानं आत्महत्या केली आहे. एसटीच्या आगारातच ही घटना घडली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. बसमधील मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून पुढील तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.

 

st driver commits suicide
एसटी आगारात बस चालकाची आत्महत्या
धुळे: एसटी बसमध्ये असलेल्या घंटी वाजवायच्या दोरीनं एका बस चालकानं आत्महत्या केली आहे. एसटीच्या आगारातच ही घटना घडली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. बसमधील मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून पुढील तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. एसटी प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीदेखील आगारात पोहोचले आहेत. एसटी चालकाच्या आत्महत्येनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पुण्याच्या शिवाजीनगर बस स्थानकात कार्यरत असणारे हिरामण देवरे यांनी धुळे एसटी आगारात आत्महत्या केली. एसटी बसमध्ये असणाऱ्या घंटी वाजवण्याच्या दोरीच्या मदतीनं देवरे यांनी बसमध्येच गळफास लावून घेतला. घटना उघडकीस आल्यानंतर बस आगारात खळबळ उडाली.
दहा दिवसांपूर्वी घर सोडले; बूट विकायला निघाले; नागपूरच्या जोडप्यासोबत वर्ध्यात आक्रित घडले
बस चालकाचा मृतदेह बसमध्ये गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाची ओळख पटवली आणि पुढील तपास सुरू केला. देवरे यांच्या आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. देवरे यांच्या निधनानं त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here