दीपक केसरकर यांनी यापूर्वीच आता मी नारायण राणे यांचा उल्लेख करणार नसल्याचे म्हटले होते. दीपक केसरकर यांना एकनाथ शिंदे गट आणि भाजपकडून तंबी मिळाल्याची माहिती आहे. नारायण राणे यांना तोंडघशी पाडल्याने दीपक केसरकर यांचे प्रवक्तेपदही काढून घेतले जाणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्याऐवजी किरण पावसकर यांच्याकडे प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. त्यामुळे आगामी काळात केसरकर विरुद्ध राणे हा वाद आणखीन रंगण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे ते तेजस ठाकरे सर्वजण आडनावामुळेच मोठे झालेत: निलेश राणे
राज्यात शिवसेनेतील बंडानंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे मैदानात उतरलेत तर पक्षप्रमुख आता सगळ्यांच्या थेट भेटी घेत आहेत. एकनाथ शिंदे गटाकडूनही ठाकरे यांना रोजच धक्के बसत आहेत. त्यामुळे आता तेजस ठाकरे यांना युवासेनाप्रमुख करुन आदित्य ठाकरे यांच्यावर मोठी जबाबदारी देण्याची उद्धव ठाकरे यांनी सुरू केली आहे.या सगळ्या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत, ‘सगळी पद ठाकरेंकडेच ठेवणार, तेव्हा कार्यकर्त्यांनो विचार करा किती साथ द्यायची यांना’, असे वक्तव्य केले आहे. उद्धव ठाकरे यांच्यापासून तेजस ठाकरेपर्यंत जे काही मिळाले ते केवळ ठाकरे आडनावामुळे बाकी यांचे कर्तृत्व शून्य, अशी टीका निलेश राणे यांनी केली.
तेजस ठाकरे यांना राजकारणातला कुठलाही अनुभव नाही. हा जंगलात फक्त पाल-सरडे शोधत होता. शोधता शोधता तो राजकारणात आलाय. गरजेची पद फक्त ठाकरे कुटुंब घेणार. बाकीच्यांनी फक्त खुर्चा टेबल उचलायचं काम करायचं, असे निलेश राणे यांनी म्हटले. ठाकरेंना बाहेरचा चालत नाही. व्यक्ती कितीही शेंबडा असला तरी आडनाव ठाकरे असेल तरच तो मुख्य पदावर दिसेल, असेही निलेश राणे यांनी म्हटले. त्यामुळे आता शिवसेनेकडून या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.