devendra fadnavis deputy chief minister of uttar pradesh according to google: देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत हे संपूर्ण देशाला माहीत आहे. मात्र गुगलवर काही वेगळंच दिसत आहे. गुगलवर देवेंद्र फडणवीस यांचं नाव टाकून सर्च केल्यावर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री अशी माहिती समोर येते.

३० जूनला फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्याआधी त्यांना विरोधी पक्षनेते म्हणून अडीच वर्षे काम केलं. ठाकरे सरकारला त्यांनी अनेक मुद्द्यांवरून घेतलं. विरोधी पक्षनेते होण्यापूर्वी फडणवीस पाच वर्षे मुख्यमंत्री होते. ३१ ऑक्टोबर २०१४ ते १२ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत फडणवीसांनी महाराष्ट्राचं नेतृत्त्व केलं.
मागील विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तासंघर्ष झाला. शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापनेची तयारी केली असताना २३ नोव्हेंबरला फडणवीस यांनी अजित पवारांसोबत पहाटे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र हे सरकार अल्पकाळ टिकलं. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालं. त्याचं सरकार अडीच वर्षांनंतर कोसळलं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, तर फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. फडणवीस हे राज्याचे नववे उपमुख्यमंत्री आहेत.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.