काय आहे प्रकरण?
तुळशी अनिल ताले (वय १८ , राहणार रेणुका नगर, डाबकी रोड, अकोला), प्रतीक मनोहर तायडे (वय २१ रा.अडगाव बु. ता.तेल्हारा, जि. अकोला), हर्ष विष्णू घाटोळ (वय १७ वर्ष ११ महिने, पळशी खुर्द ता.खामगाव, जि.बुलढाणा) आणि प्रफुल पांडुरंग लंगोटे (वय १९, राहणार न्यू भीम नगर, कृषी नगर, अकोला) या चौकांची बेपत्ता असल्याची तक्रार बाळापुर आणि सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात दाखल आहे. हे चौघेही बाळापुर तालुक्यातील व्याळा येथील मानव सिटी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. सोमवारपासून घरून कॉलेजमध्ये गेले होते. मात्र, अद्याप अद्याप घरी परतलेच नाही. हर्ष आणि प्रतिक याचं कॉलेजमध्ये आयटीआय शिक्षण घेत होते तर प्रफुल आणि तुळशी हे संगणकाचा शिक्षण घेत आहे.
चौघेही झाले होते नापास…
मानव पॉलिटेक्निक कॉलेजचा यंदाचा निकाल अतिशय खराब लागलाय. सूत्राच्या माहितीनुसार राज्यातच पॉलिटेक्निकचा निकाल डाऊन होता. मानव पॉलिटेक्निक कॉलेजमधून बेपत्ता असलेले चौघेजण नापास झाले असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे ते तणावात होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, मानव कॉलेजमधून एकटी विद्यार्थिनी पास झाली अन्य सर्व विद्यार्थी नापास झाले असल्याची माहिती समोर येत आहे.
प्रफुल रात्री घरी आला परतलाच नाही…
प्रफुल लंगोटे हा सोमवारी सायंकाळी ६ त्याच्या घरी परतला, अन् घरातून कॅमेरा आणि लॅपटॉप घेऊन आपल्या शाईन गाडीने निघून गेला. घरच्यांना तो बाहेर फोटो काढण्यासाठी चाललोय असं सांगून निघाला होता. तेव्हापासून तो बेपत्ता आहे. अशी माहिती त्याच्या घरच्यांनी दिली आहे. दरम्यान, कम्प्युटर पॉलीटेक्निकमध्ये संगणकाचं शिक्षण घेत असतांना सेकंडिअयरमध्ये त्याचे चार विषय बॅक राहिले आहेत.
तुळशी नापास झाल्याने होती तणावात…
तुळशी ताले ही देखील मानव पॉलिटेक्निक कॉलेजमधून कम्प्युटर पॉलिटेक्निकचं शिक्षण घेत आहे. ती देखील नापास झाली असून तिचे चार विषय बॅक राहिले. त्यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून रडतच होती, अशी माहीती तिच्या घरच्यांनी दिली आहे. सोमवारी ती कॉलेजला जाते म्हणून घरून निघून गेली. मात्र, तेव्हापासून अजूनही घरी परतलीच नाही.
प्रतीक हर्षने दिलीचं नाही परीक्षा…
प्रतिक आणि हर्ष मानव पॉलिटेक्निक कॉलेजचा भाग असलेल्या आयटीआयमध्ये शिक्षण घेत होते. त्यांची चार ऑगस्टपासून परीक्षा होती. मात्र, त्यांनी ती परीक्षा दिलीचं नाही आहे. हे चौघेदेखील सोमवारपासून म्हणजेच एक ऑगस्टपासून बेपत्ता आहे.
बेपत्ता विद्यार्थ्यांचा शोध सुरु…
दरम्यान, अद्यापपर्यंत चौघेही नातेवाईकांचे बयान नोंदवले गेले आहे. सोबतच त्यांच्या कॉलेजमधील शिक्षक आणि इतर मित्र मैत्रिणींचे देखील जवाब नोंदविला आहे. सध्या त्यांचा शोध सुरु आहे. लवकर त्यांचा शोध घेण्यात येईल असे बाळापुर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक श्रीराम जाधव यांनी ‘मटा ऑनलइन’शी बोलताना माहिती दिली.
हे चौघेही कुठे दिसून आल्यास तात्काळ अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक मुकुंद देशमुख यांना संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. ७०२०८२१७८५ आणि ९८५०५२८८८५ या मोबाईल क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.