चंद्रपूर शहरातील राजीव गांधी कॉलेज परिसरात दुर्मीळ पक्षांची शिकार केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिकार केलेले पक्षी हातात घेऊन जात असताना एका तरूणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

शिकार केलेले पक्षी राजरोसपणे हातात घेऊन तरुण जात आहे. त्याचा चेहऱ्यावर कुठलीच भीती दिसत नाही. उलट हा तरुण व्हिडीओ काढणाऱ्या तरुणालाच धमकावत आहे. “फोटो मत निकाल बोला ना तेरे को! समझ नही आ रहा क्या..! एकबार बताया तो…!’, अशा शब्दांत पक्षी घेऊन जाणारा तरुण व्हिडीओ काढणाऱ्यावर दमदाटी करत आहे.
व्हिडीओ काढणाऱ्यानं हा व्हिडीओ वन्यजीवांच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्थेच्या अधिकृत व्हॉट्स ऍप ग्रुपमध्ये शेअर केला. हा व्हिडीओ आज काढल्याचे त्यानं नमूद केलं आहे. राजीव गांधी कॉलेजच्या अगदी समोर असलेल्या वस्तीकडे हा तरूण गेल्याचे व्हिडीओ शूट करणाऱ्यानं लिहिलं आहे. या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.