online satbara utara | जी अवस्था वाड्या-वस्त्यांची होती, ती शेतांचीही आहे. पूर्वीच्या काळी अनेक शेतांना, गटांना, सर्वेक्रमांकांना जातीवाचक नावे देण्यात आलेली होती. हीच नावे शेतीच्या सातबारा उताऱ्यावर स्थानिक नाव या सदरात नोंदली गेली होती. जातीवाचक नावावर जणू सरकारी मोहरच उमटलेली होती. त्याच नावाने त्या शेतांची ओळख आणि व्यवहारही सुरू होते

 

Satbara
सातबारा

हायलाइट्स:

  • गेल्यावर्षी सरकारने हा निर्णय घेतला होता
  • या निर्णयाची अहमदनगर जिल्ह्यात आता अंमलबजावणी सुरू
  • जातीवाचक नावाची नोंद कमी करून सुधारित नोंद करण्याचा निर्णय
अहमदनगर: गावे आणि वस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याच्या निर्णयानंतर शेतकऱ्यांच्या सातबारा उताराऱ्यावरील (7/12 extract) शेतांची जातीवाचक नावेही बदलण्यात येत आहेत. गेल्यावर्षी सरकारने घेतलेल्या या निर्णयाची अहमदनगर जिल्ह्यात आता अंमलबजावणी सुरू झाली असून राहाता व नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांना जातीचा उल्लेख वगळलेले नवे उतारे देण्यास सुरवात झाली आहे. (Big decision about

समाजमनावरील जातीव्यवस्थेचा पगडा दूर करण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून सरकारने गावे आणि वाड्यांची जातीवाचक नावे बदलण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर असाच निर्णय शेतांच्या बाबीत घेण्यात आला. जी अवस्था वाड्या-वस्त्यांची होती, ती शेतांचीही आहे. पूर्वीच्या काळी अनेक शेतांना, गटांना, सर्वेक्रमांकांना जातीवाचक नावे देण्यात आलेली होती. हीच नावे शेतीच्या सातबारा उताऱ्यावर स्थानिक नाव या सदरात नोंदली गेली होती. म्हणजे जातीवाचक नावावर जणू सरकारी मोहरच उमटलेली होती. त्याच नावाने त्या शेतांची ओळख आणि व्यवहारही सुरू होते.
डिजिटल पद्धतीमुळे अचूक सातबारा
राज्य सरकारच्या महसूल विभागाने २५ ऑगस्ट २०२१ रोजी सातबारा उतार्‍यातील शेतीचे स्थानिक नाव या रकान्यात नोंदवण्यात आलेल्या जातीवाचक नावाची नोंद कमी करून सुधारित नोंद करण्याचा निर्णय जारी केला आहे. त्या शेतांना जातीच्या नावाऐवजी गावातील स्थानिक-भौगोलिक स्थितीशी निगडित, नदी नाल्याची निगडित नावे देण्यात यावी. अशा सूचना देण्यात आल्या होत्या. या निर्णयाची नगर जिल्ह्यात राहाता व नेवासा तालुक्यात करण्यात आली आहे. राहात्यामधील बाभळेश्वर व नेवासामधील रामडोह, गोपाळपूर, वरखेड, माळेवाडी दुमला, सुरेगाव दहिगाव, गळनिंब व खामगाव या गावात ग्रामपंचायतींनी तसे ठराव केले. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी ते मंजूर केले आहेत. त्यामुळे आता या गावातील उताऱ्यांवरील शेतीची जातीवाचक नावे बदलण्यात येणार आहेत. नव्या नावांचे उतारे आता शेतकऱ्यांना दिले जाऊ लागले आहेत.
‘सात-बारा’ चुकांवर उतारा!
गरजेनुसार स्थानिक नावांत बदल करण्यात आले आहेत. नदीची, शेतकऱ्यांच्या अडनावांची, परिसरांची नावे देण्यात येत आहेत. बाभळेश्वर येथील एका शेतकऱ्याच्या जमिनीला पूर्वी जातीवाचक स्थानिक नाव होते. ते बदलण्यात येऊन आता बनसोड यांचा गटनंबर असे नाव मिळाले आहे. या नव्या नावाचा उतारा त्यांना महसूल विभागाकडून नुकताच देण्यात आला आला. यासंबंधी राहात्याचे तहसिलदार कुंदन हिरे म्हणाले, ‘वाड्या वस्त्यांच्या नावानंतर आता उताऱ्यावरील जातीवाचक नावेही जाणार आहेत. त्यामुळे गावागावात सामाजिक वातावरण निकोप होण्यास मदत होईल. आहे. यातून अ‍ॅट्रासिटीच्या गुन्ह्यांच्या प्रमाणातही घट होण्यास मदत होईल,’ अशी अपेक्षा आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network

1 COMMENT

  1. Hello! I simply wish to offer you a big thumbs up for the excellent information you have here on this post. I am coming back to your web site for more soon.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here