maharashtra weather forecast, Kolhapur Rains : कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला, राजाराम बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली, वाहतूक बंद – kolhapur rains rajaram dam under water for the second time traffic stopped
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पंधरा दिवसानंतर पुन्हा पावसाची जोरदार बॅटिंग सुरू झाली आहे. जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. कोल्हापुरातील कसबा बावडा येथील राजाराम बंधारा हा दुसऱ्यांदा पाण्याखाली गेल्या आहे. यामुळे यावरील वाहतूक आता बंद करण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात १५ दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा जोर धरला आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. काल दिवसभराच्या पावसाने कसबा बावडा येथील राजाराम बंधारा हा दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे. यामुळे या बंधाऱ्यावरून वाहतूक आता बंद करण्यात आले आहे. एका तरुणीसह ३ तरुण बेपत्ता, सहा दिवसांनी पोलिसांना मिळाली खळबळजनक माहिती जिल्ह्यातील गगनबावडा शाहूवाडी भुदरगड या तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आले आहे. पंचगंगेची पाणी पातळी ही सध्या १९ फुटावर असून आज सकाळपासून पावसाचा जोर काही अंशी कमी झाला आहे. मात्र, हवामान खात्याकडून नऊ ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस राहणार असल्याचा इशारा देण्यात आला असल्याने येत्या काळात पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे यंत्रणाही सतर्क झाले असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आपत्ती आल्यास त्याचा सामना करण्यासाठी तयारी सुरू आहे.
दरम्यान, राधानगरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून आज सकाळी सात वाजेपर्यंत धरण ७८ टक्के भरले आहे. गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने जडे मारल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र, पावसाने पुन्हा जोर धरल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
Hello! I simply wish to offer you a big thumbs up for the excellent information you have here on this post. I am coming back to your web site for more soon.
Hello! I simply wish to offer you a big thumbs up for the excellent information you have here on this post. I am coming back to your web site for more soon.