अंटू ऊर्फ सचिन हा रिक्षा चालवायचा. दुचाकीचा धक्का लागल्याने त्याचा रवी इंगोलेशी वाद झाला होता. हाच राग मनात धरून रवी इंगोले आणि त्याच्या मित्रांनी सचिनवर हल्ला केला. चाकू आणि रॅफ्टरनं केलेल्या हल्ल्यात सचिनचा मृत्यू झाला. रात्री १ वाजता सचिन उर्फ अंटू त्याच्या घराजवळ असलेल्या चौकात बसला होता. त्यावेळी रवी इंगोले, आकाश विघ्ने आणि यश रायबोले तिथे पोहोचले.
तिघांनी सचिनवर चाकूने सपासप वार केले. आरोपींची सचिनच्या डोक्यावर रॅफ्टर मारला. या हल्ल्यात जखमी झालेल्या सचिनचा मृत्यू झाला. पोलीस तपासाची चक्रे वेगाने फिरवून तिघांना अटक केली. न्यायालयाने तिन्ही आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
amravati murder, दुचाकीचा धक्का लागल्यानं वाद; मनात राग धरून चाकू अन् रॅफ्टरनं हल्ला करत एकाचा खून – three persons killed auto driver with knife and rafter in amravati
अमरावती: दुचाकीने जात असताना ३८ वर्षीय अंटू नामक व्यक्तीचा परिसरातच राहणाऱ्या एका २३ वर्षीय तरुणाच्या दुचाकीला धक्का लागला. यातून त्यांच्यात किरकोळ वाद झाला. मात्र, ही खदखद मारेकऱ्यांच्या मनात होती. त्यानंतर चार तासांनी मध्यरात्री एकच्या सुमारास तीन जणांनी चाकू व रॅफ्टरने हल्ला चढवून अंटूचा खून केला.
Hello! I simply wish to offer you a big thumbs up for the excellent information you have here on this post. I am coming back to your web site for more soon.