मुंबई: आज प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन असल्यामुळे ऑनलाइन शॉपिंगचे प्रमाण वाढलंय. अगदी कपड्यांपासून ते इलेक्ट्रॉनिक वस्तूंपर्यंत सर्वच वस्तू घरबसल्या खरेदी करणे शक्य आहे. मोबाइलच्या एका क्लिकवर तुम्ही या वस्तू खरेदी करू शकता. ऑनलाइन शॉपिंगचं प्रमुख कारण म्हणजे वस्तूंवर मिळणारे डिस्काउंट. अशा अनेक ई-कॉमर्स साइट आहेत, ज्यावरून तुम्ही सहज वस्तूंची खरेदी करू शकता. पण अनेकदा अशा ई-कॉमर्स साइटकडून ग्राहकांची ग्राहकांची दिशाभूल केली जाते.

असाच अनुभव अभिनेता सुयश टिळक याला आला आहे. ऑनलाइन शॉपिंग करताना जास्तीत जास्त डिस्काउंट असेल अशा साइट्सला आपण प्राधान्य देतो. सेल आणि डिस्काउंट नुसार एखाद्या वस्तूची किंमत नेहमीपेक्षा कमी असेल , ती वस्तू आपल्याला कमी दरानं मिळेल या आशेनं आपण शॉपिंग करत असतो. पण अनेकदा ग्राहकांची दिशाभूल होत असते. डिस्काउंट असून देखील त्या वस्तूची किंमत नेहमीच्या किंमतीपेक्षा जास्त असेल तर? हो, हा असाच अनुभव सुयशला आलाय.
आमिर खानच्या सिनेमातलं गाणं गुणगुणत अभिज्ञा भावेनं शेअर केले पतीसोबतचे Photo, तुम्हीही पाहा
त्यानं एक स्क्रिनशॉट शेअर केलाय. आणि ही कसली डील आहे? असा प्रश्नही ई-कॉमर्स साइटला टॅग करत विचारलाय.

काय आहे नेमकी भानगड?
एका वस्तूची रेग्युलर म्हणजेच नेहमीची किंमत १, ७९९ इतकी आहे. तर स्पेशल डील म्हणजेच डिस्काउंटनंचर ही किंमत कमी होण अपेक्षीत होतं. परंतु तसं नसून या वस्तूची किंमत २, १९९ इतकी आहे.
सुरेश वाडकरांना लग्नासाठी आलं होतं माधुरी दीक्षितचं स्थळ, पण या कारणामुळे गायकाने नाकारलं?
ही डील पाहिल्यानंतर सुयश देखील गोंधळलाय. त्यानं डोक्याला हात लावत असल्याचा एके स्टीकरही शेअर केलाय.

online shopping frauds

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here