Governor Bhagat Singh Koshyari | राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नुकतेच मुंबईतील (Mumbai) एका कार्यक्रमात वादग्रस्त विधान केले होते. गुजराथी आणि मारवाडी लोक निघून गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. त्यामुळे भाजपची पुरती कोंडी झाली होती. controversial statement about Mumbai

हायलाइट्स:
- प्रसारमाध्यमांचे कॅमेरे दिसताच भगतसिंह कोश्यारी यांनी पाठ फिरवली
- भगतसिंह कोश्यारी यांनी काढता पाय घेतला
- इथे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याशी बोला
मात्र, येथून निघण्यापूर्वी राज्यपाल कोश्यारी यांनी प्रसारमाध्यमांशी दोन-चार मोघम वाक्य बोलली. मी बोलणार नाही. इथे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याशी बोला. मला बोलायचेच नाही. राज्यपालांना न बोलण्याचे आदेश दिले आहेत, असे कोश्यारी यांनी म्हटले. कोश्यारी यांचे हे एकूण वक्तव्य पाहता भाजपश्रेष्ठींकडून त्यांना न बोलण्याची सक्त ताकीद देण्यात आल्याचे दिसत आहे. मात्र, राज्यपाल हे घटनात्मक पद असल्याने त्यांना अशाप्रकारे बोलण्यास कोणी मनाई करू शकते का, या प्रश्नावरून आता वाद निर्माण होऊ शकतो.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नुकतेच मुंबईतील एका कार्यक्रमात वादग्रस्त विधान केले होते. गुजराथी आणि मारवाडी लोक निघून गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. त्यामुळे भाजपची पुरती कोंडी झाली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप आणि एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांनीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या या वक्तव्यापासून फारकत घेत हात झटकले होते. त्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे एकाकी पडले होते. त्यांनी स्पष्टीकरण देऊनही राज्यातील नागरिकांचा रोष कमी झाला नव्हता.
अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सपशेल माफी मागावी लागली होती. महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाचं योगदान सर्वाधिक आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या या भूमीत राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली याचा मला अभिमान वाटतो, असे राज्यपालांनी आपल्या स्पष्टीकरणात म्हटले होते.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.