झुनझुनवाला यांनी केलेली खरेदी-विक्री
राकेश झुनझुनवाला यांच्या प्रत्येक हालचालीवर बाजार नजर ठेवून असते, यामागे कारण देखील तसेच आहे. ते ज्या ठिकाणी गुंतवणूक करतील तिथे खेळ पालटतो. नेहमीच आक्रमकता योग्य नसते, हे देखील त्यांच्याकडून शिकता येईल. काही वेळा शांत राहणे अगदी योग्य ठरते. कॉर्पोरेट डेटाबेस एस इक्विटीनुसार, आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या पहिल्या तिमाहीत झुनझुनवाला यांचा सर्वात मोठा सट्टा टायटनवर होता. यामध्ये झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा यांची ५.०५ टक्के भागीदारी होती. २६ जुलै २०२२ पर्यंत झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलियोमध्ये टायटनचे एकूण मूल्य अंदाजे १०,३०० कोटी रुपये इतके होते. स्टार हेल्थमध्ये त्यांची भागीदारी १४.३९ टक्के होती. म्हणजेच त्यात कोणताही बदल झालेला नव्हता. फोर्टीस हेल्थकेयरमध्ये ४.२३ टक्के, कॅनरा बँकेत १.९६ टक्के आणि क्रिसीलमध्ये २.९२ टक्के इतकी त्यांची भागीदारी होती. त्यांच्या पत्नीकडे स्टार हेल्थमध्ये ३.१० टक्के आणि क्रिसीलमध्ये २.६५ टक्के भागीदारी होती. म्हणजेच त्यांच्या पोर्टफोलियोमध्ये फारसा बदल झालेला नाही.
झुनझुनवाला यांची गेल्या तिमाहीत एकमेव खरेदी मिड – कॅप कंपनी एस्कॉर्टस कुबोटा होती. यामध्ये त्यांनी १.३९टक्के हिस्सा खरेदी केला होता. याउलट, जून तिमाहीत त्यांनी टाटा मोटर्सचे ३ दशलक्ष शेयर्स विकले. त्यांनी इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्समधील त्यांचा हिस्सा १.२८ टक्क्यांवरून १.१७ टक्क्यांवर आणत कमी केला. डेल्टा कॉर्प, इंडियाबुल्स रियल एस्टेट, नाल्को आणि टीव्ही 18 ब्रॉडकास्टमधील त्यांची भागीदारी १ टक्क्यांनी घसरली.
उलथापालथ झालेली असतानाही झुनझुनवाला आणि त्यांची पत्नीजवळ २६ जुलैपर्यंत २७,३०० कोटी रुपयांचे शेयर्स होते. ३० जून २०२२ पर्यंत या दोघांची ३० पेक्षा जास्त कंपन्यांमध्ये भागीदारी होती. तर २०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत शेवटी त्यांची संख्या ३५ होती.
गुंतवणूकदारांनी काय केले पाहिजे?
बहुतेक तज्ञ गुंतवणूकदारांना नेहमी एक सल्ला देतात, ते सांगतात की मोठ्या गुंतवणूकदारांच्या मागे कधी ही धावू नये. अशी रणनिती आखल्याने आपल्याला नुकसानाला सामोरे जावे लागते. गुंतवणुकीचे वाटप आणि त्याच्या उपयोजनाचे तर्क यासंबंधी संपूर्ण डेटा कधीही उपलब्ध नसतो, हे यामागील कारण आहे. प्रत्येक गुंतवणूकदाराचे स्वतःचे ध्येय, उद्दीष्ट असते. हे उद्दीष्ट साध्य करण्याची कालमर्यादा देखील वेगवेगळी असते आणि जोखीम उचलण्याच्या क्षमतेतही फरक असतो. त्यामुळे या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आणि यांचा योग्य तो अभ्यास करून गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा.