दरम्यान, येत्या ४ तासात हलक्या ते तीव्र स्वरूपाच्या सरी सकाळी १०:३० वाजता जारी करण्यात आला आहे. पुढील ३-४ तासात सातारा जिल्ह्यातील रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड कोल्हापूर घाट परिसरात काही ठिकाणी हलक्या ते तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. आयएमडी मुंबईकडून देण्यात आला आहे.
रत्नागिरी तालुक्यात भंडारपुळे – मालगुंड पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. रत्नागिरीमध्ये शनिवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत असून अनेक ठिकाणी पाणी भरले आहे. तर भंडारपुळे मालगुंड दरम्यान असणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असून वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे असे तहसील विभागाने कळवले.
कासे- पुर्ये तर्फे सावर्डे रस्त्यावर कोसळली दरड
संगमेश्वर तालुक्यातील कासे- पुर्ये तर्फे सावर्डे रस्त्यावर दरड कोसळली आहे. त्यामुळे येथील बस वाहतूक थांबली आहे. कोणत्याही प्रकारचे नुकसान नाही असे तालुका प्रशासनाने कळवले आहे.
‘जगबुडी’ इशारा पातळीच्या वर
जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस सुरू आहे. खेडजवळ जगबुडी नदी इशारा पातळी वर वाहत आहे.