जळगाव : नुकत्याच रावेर मतदारसंघात झालेल्या ग्रामंपचायत निवडणूकीत चार ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी वर्चस्व सिध्द केलं आहे. हा आनंद साजरा करत असतानाच एकनाथ खडसेंना शिंदे गटात सहभागी असलेल्या अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मोठा धक्का दिला आहे. खडसेंचा बालेकिल्ला असलेल्या बोदवड तालुक्यातील राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे.

बोदवड तालुक्यातील राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शनिवारी रात्री शिंदे गटात सहभागी झालेले अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघातील शिंदे गटाचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर विश्वास ठेवत शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश करुन खडसेंना ‘राम राम’ केला आहे.

महागाईच्या भडक्यात मिरचीचा ठसका; दरामध्ये झाली मोठी वाढ
जळगाव जिल्हा दूध संघानंतर शिंदे गटाने एकनाथ खडसे यांना आपल्या बालेकिल्ल्यातच मोठा धक्का दिला आहे. बोदवड तालुक्यातील साळशिंगी येथील शेकडो राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुक्ताईनगरचे शिंदे गटाचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिंदे गटात प्रवेश केल्याने एकनाथ खडसेंना हा मोठा धक्का मानला जात आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसेंच्या नेतृत्वात बोदवड नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहा उमेदवारांनी विजय मिळविला होता. तर दोन दिवसांपूर्वी रावेर तालुक्यात ११ ग्रामपंचायतींच्या निवडणूका पार पडल्या. यापैकी चार ग्रामपंचायतींवर एकनाथ खडसेंच्या नेतृत्वात झेंडा फडकावला. असं असतांना बोदवड येथील शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आधीच एका रात्रीत जिल्हा दूध संघाची चौकशी लावून तसेच त्याठिकाणी शिंदे सरकारने गिरीश महाजन समर्थकांचे प्रशासक मंडळ नियुक्त करत एकनाथ खडसेंना धक्का दिला होता. त्याला काही दिवस उलटत तोवर बोदवड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश हा दुसरा मोठा धक्का खडसेंना देण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात आणखी काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

बाजारात उलथापालथ, पण झुनझुनवाला एकदम ओक्केमध्ये; जाणून घ्या ‘बिग बुल’ची स्ट्रॅटर्जी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here