two patients test hiv positive in varanasi after getting tattoos on their bodies: उत्तर प्रदेशच्या वाराणसीत जवळपास डझनभर जणांना एचआयव्हीची लागण झाली आहे. टॅटू काढणारे दोन जण एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळून आले. स्थानिक प्रशासनानं या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यामुळे आरोग्य विभागापासून पीडितांच्या घरांपर्यंत एकच खळबळ उडाली आहे.

 

tattoo
संग्रहित छायाचित्र
वाराणसी: उत्तर प्रदेशच्या वाराणसीत जवळपास दोन जणांना एचआयव्हीची लागण झाली आहे. टॅटू काढणारे दोन जण एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळून आले. स्थानिक प्रशासनानं या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यामुळे आरोग्य विभागापासून पीडितांच्या घरांपर्यंत एकच खळबळ उडाली आहे.

एचआयव्ही पीडित तरुणांची तपासणी पंडित दिनदयाळ उपाध्याय रुग्णालयात करण्यात आली. एकाच सुईनं टॅटू काढण्यात आल्यानं दोन जणांना एचआयव्हीची लागण झाल्याचं एँटी रेट्रो व्हायरल ट्रीटमेंट करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं. एचआयव्हीची लागण झालेल्या सगळ्या तरुणांनी नुकताच टॅटू काढला होता. टॅटू काढल्यानंतर या सगळ्यांना ताप आला, अशक्तपणा जाणवू लागला. अनेकांनी तापावरची औषधं घेतली. मात्र त्यांचा ताप कमी झाला नाही. वजन कमी होत असल्याचं त्यांना जाणवलं. यानंतर त्यांनी रक्त चाचणी केली. या सगळ्यांना एचआयव्हीची लागण झाल्याचं समोर आलं.
बायको सर्वांसमोर झाडूनं मारते! पतींच्या हक्कांसाठी लढणाऱ्या तरुणाची आत्महत्या; नदीत जीव दिला
दोन जणांना एचआयव्ही झाल्याचं समजताच आरोग्य यंत्रणा हादरली. प्रशासनानं तपास सुरू केला. तेव्हा २ जणांनी एकाच जत्रेत एकाच स्टॉलवर टॅटू काढल्याची माहिती उघडकीस आली. वाराणसीच्या बडागाव येथील २० वर्षांच्या तरुणानं जत्रेत टॅटू काढला. अन्य पीडितदेखील त्याच जत्रेला गेले होते. त्यानंतर सगळ्यांची प्रकृती बिघडली. त्यांच्या शरीरात चिंताजनक लक्षणं दिसू लागली.
क्रौर्याची परिसीमा! नराधमानं पत्नी अन् लेकीचं मुंडकं छाटलं; बायकोचं डोकं सासरी ठेऊन आला
टॅटू काढताना काळजी घ्या!
अनेकजण स्वस्तात टॅटू काढून मिळत असल्यानं अनप्रोफेशनल लोकांकडून टॅटू काढून घेतात. टॅटू काढण्यासाठी वापरली जाणारी सुई महाग असल्यानं काही जण ती बदलत नाहीत. एकाच सुईचा वापर करून अनेकांच्या शरीरावर टॅटू काढले जातात. त्यामुळे एचआयव्हीची लागण होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे स्वस्त टॅटू महागात पडू शकतो.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here