Parbhani Crime News : परभणी जिल्ह्यात एका साडेचार वर्षाच्या चुलत बहिणीवर पंधरा वर्षाच्या भावाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील मोची गल्लीमध्ये ही घडली आहे. आरोपीविरोधात नानालपेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हायलाइट्स:
- चुलत भावाकडून साडेचार वर्षाच्या बहिणीवर अत्याचार
- आरोपीविरोधात गुन्हा दाखल
- परभणीतील मोची गल्लीतील घटना
भंडारा येथे मदतीच्या बहान्याने एका महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली असतानाच परभणी शहरातील मोची गल्ली येथे पंधरा वर्षाच्या चुलत भावाने घरी कोणी नसताना साडेचार वर्षाच्या चुलत बहिणीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे.
चुलत भावाने अत्याचार केल्यानंतर पीडित मुलीची आई घरी आल्यानंतर मुलीने घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला असता मुलीच्या आईच्या पायाखाली जमिनी सरकली त्यानंतर मुलीचीच्या आई ने नानलपेठ पोलीस ठाणे गाठून अत्याचार करणाऱ्या नराधमक चुलत भावा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती नानालपेठ पोलिसांकडून आज रविवारी देण्यात आली आहे.प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network