पुणे : शिवसेना शिंदे गट आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर कात्रज येथे हल्ला झाला होता. आदित्य ठाकरे यांची दि २ ऑगस्ट रोजी सभा झाल्यानंतर कात्रज चौकामध्ये उदय सामंत यांची गाडी पास होत असताना जमलेल्या करकर्त्यांनी त्यांच्या गादीवर हल्ला करून गाडीची काच फोडण्यात आली होती. याबाबत भरती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. त्यामध्ये सभा आयोजासह ५ जाणांना अटक करण्यात आली होती. मात्र, आता त्याच कात्रज चौकात उदय सामंत यांची जाहीर सभा होणार आहे अशी माहिती आहे.

तानाजी सावंत, किरण साली, नाना भानगिरे यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र, वार आणि वेळ अजून निश्चित झाली नाही. पण उदय सामंत यांची चार ठिकाणी सभा होणार असून कात्रज इथेही सभा होणार असल्याची माहिती आहे.

कोकणात तुफानी पाऊस सुरू, ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून इशारा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा २ ऑगस्ट रोजी पुणे दौरा होता. सगळे कार्यक्रम आटपून ते हडपसरवरून आमदार तानाजी सावंत यांच्या कात्रज इथे निवासस्थानी जाणार होते. यावेळेस त्यांच्यासोबत आमदार उदय सामंत होते. मात्र, त्यांनी गुगल मॅप लावण्याने त्यांच्या रस्ता चुकला आणि थेट ते आदित्य ठाकरे यांच्या सभे ठिकाणी पोहचे.

तिथे जमलेल्या जमवाणे त्यांना पाहताच गद्दार-गद्दार घोषणा देत त्यांच्या गाडीवर हल्ला केला. या प्रसंगात त्यांच्या गाडीची काच फुटली. याबाबत भरती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहेत आणि ६ आरोपीना अटक केली आहे. मात्र, ज्या ठिकाणी उदय सामंत यांच्यावर हल्ला झाला, त्याच कात्रज चौकात सामंत यांची जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती नाना भानगिरे यांनी दिली आहे.

एका तरुणीसह ३ तरुण बेपत्ता, सहा दिवसांनी पोलिसांना मिळाली खळबळजनक माहिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here