याशिवाय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अतिरिक्त मुख्य सचिव, संचालक पशुधन आणि मुरादाबाद आयुक्तांना संपूर्ण प्रकरणाचा तपास अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणात जे कोणी सहभागी असतील त्यांना सोडले जाणार नाही, असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
चारा खाल्ल्याने १८८ गायी आजारी पडल्याचे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत अन्नातून विषबाधा झाल्याचे दावे केले जात आहेत. चारा पुरवठा करणाऱ्या ताहीर नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केल्यानंतर त्याच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. सध्या जिल्हाभरातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसोबतच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे हे पथक घटनास्थळी आहे. इतर आजारी गायींवर उपचार सुरू असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. काही गायींची प्रकृती सुधारत आहे, असं देखील सांगण्यात आलं आहे.
जिल्हा दंडाधिकारी बाळकृष्ण त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी गोशाळा प्रभारींनी एका नवीन व्यक्तीकडून पशुखाद्य खरेदी केले होते. ते खाल्ल्यानंतर गायी आजारी पडल्या त्यातून त्यांना विषबाधाही झाला. दरम्यान, आजारी गायींवरही डॉक्टरांकडून उपचार केले जात आहेत. यापैकी काहींचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत मरण पावलेल्या गायींची संख्या जवळपास ५५ वर पोहोचली आहे.
गोठ्याचा कारभार पाहणाऱ्या ग्रामपंचायत विकास अधिकाऱ्यांना जिल्हा प्रशासनाने निलंबित केलं आहे. गोशाळेत प्रसारमाध्यमांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली असून जिल्हा प्रशासन माध्यमांना फोटो आणि व्हिडीओ तयार करून पाठवत आहेत.