त्यात शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख उमेश मुंढे (Umesh Mundhe) हे देखील आपल्या कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. आज रविवारी खासदार हेमंत पाटील यांच्या निवासस्थानी उमेश मुंढे यांनी खासदार हेमंत पाटील यांची भेट घेतली. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यापूर्वीच शिवसेनेला मोठे खिंडार पडत आहे.
कोण आहेत उमेश मुंढे ?
उमेश मुंढे हे शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख आहेत. मुंढे यांनी नांदेड पंचायत सदस्यपदापासून ते नांदेड महानगरपालिकेच्या नगरसेवक पदावर काम केले आहे. उमेश मुंढे यांच्या पत्नी नांदेड महानगर पालिकेमध्ये नगरसेविका होत्या. कळमनुरीचे शिंदे गटात सामील झालेले आमदार संतोष बांगर यांचे ते निकटवर्तीय आहेत. जिल्ह्यात उमेश मुंढे यांना ‘सरकार’ या नावाने ओळखले जाते.
शिवसेनेचे डॅशिंग नेते म्हणूनही ओळख
उमेश मुंढे यांची शिवसेनेचे डॅशिंग नेते म्हणूनही ओळख आहे. उमेश मुंढे यांच्या जाण्याने शिवसेनेला ग्रामीण भागात मोठी खिंडार पडणार आहे. कारण उमेश मुंढे यांच्या सोबत जिल्ह्यातील अनेक तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, शाखा प्रमुख जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यात शिवसेनेला मोठेच खिंडार पडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.