सुवर्णपदक कॅनडाच्या इव्हानला मिळाले आहे. त्याने ३८:३७:३६ मिनिटांमध्ये प्रथम येत शर्यत पूर्ण केली आहे. तर रौप्य पदक हे ऑस्ट्रेलियाच्या डेक्लन टिंगेला मिळाले आहे. त्याने ३८:४२:३३ या वेळेसह शर्यत पूर्ण केली आहे. १० खेळाडूंच्या मैदानी स्पर्धेतील अन्य भारतीय स्पर्धक अंतीम ४३:०४:९७ या वेळेसह स्पर्धेत नवव्या स्थानावर राहिला. न्यूझीलंडच्या क्वेंटीनल ५,००० मीटर नंतर अनेक उल्लंघनांसाठी अपात्र ठरवण्यात आले आणि त्यामुळे नऊचं स्पर्धक शेवटी शिल्लक राहिले.
संदीप पहिल्या १ हजार मीटरमध्ये आघाडीवर होता आणि नंतर तिसर्या स्थानावर आला. त्याने त्यानंतर अव्वल स्थान पटकावले आणि अर्धी शर्यत तो तिथेच टिकून राहिला. मात्र, ६,००० मीटरवर तो तिसर्या क्रमांकावर आला आणि ९,००० मीटरवर दुसर्या स्थानावर पोहोचला आणि शर्यतीच्या अखेरीस त्याने तिसरे स्थान पटकावले.
काल शनिवारी भारताची प्रियंका गोस्वामी राष्ट्रकुल स्पर्धेतील रेसवॉक स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. तिने १०,००० मीटर स्पर्धेत ४३:३८:८३ या वेळेसह रौप्य पदक जिंकले आहे.