बर्मिंगहम : भारताला आता बॅडमिंटनमध्ये Gold Medalची संधी, सिंधू आणि लक्ष्य सेन यांची भन्नाट कामगिरी कुस्ती आणि बॉक्सिंगनंतर आता भारताला आस लागली आहे ती बॅडमिंटनमध्ये पदक जिंकण्याची. कारण भारताच्या पी.व्ही.सिंधू आणि लक्ष्य सेन यांनी दमदार कामगिरी करत अंतिम फेरीत स्थान पटकावले आहे. त्यामुळे आता बॅडमिंटनमध्ये भारताला सुवर्णपदक मिळण्याची नामी संधी असेल.

ऑलिम्पिक पदकविजेत्या सिंधूने उपांत्य फेरीत मलेशियाच्या जिया याव मिनवर सलग दोन सेट्समध्ये विजय मिळवत महिला एकेरीची फायनल गाठली. तर लक्ष्य सेनने अटीतटीच्या सामन्यात सिंगापूरच्या जिया हेंगचं आव्हान मोडीत काढलं. पण पुरूष एकेरीच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात किदंबी श्रीकांतला मलेशियन प्रतिस्पर्ध्याकडून पराभव स्विकारावा लागला. २७ वर्षीय पिव्ही सिंधूने तिच्या अनुभवाच्या जोरावर सिंगपूरच्या येओ जिया मिनलवर ४९ मिनिटांच्या लढतीत २१-१९, २१-१७ असा दमदार विजय साकारला. सिंधूने २०१८ आणि २०१४ च्या स्पर्धेमध्ये एक रौप्य आणि एक कांस्य पदक पटकावले होते. या खेळात देखील सिंधूने आपली पकड मजबूत ठेवली होती.

रोहित शर्मा संघाबाहेर; पाचव्या ट्वेन्टी-२० सामन्यासाठी भारताचा संघ जाहीर, चार खेळाडूंना संधी
बॅडमिंटनमध्ये जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानावर असलेल्या सेनने सिंगापूरच्या जिया हेंग तेहविरुद्ध वर्चस्वपूर्ण सुरुवात केली. मात्र, सेनने पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत २१-१०, १८-२१,२१-१६ असा विजय मिळवला. सेन म्हणाला की, “मी दुसर्‍या सामन्यात मला खेळ नीट जमत नव्हता. पण मी शेवटी नीट खेळण्यात यशस्वी ठरलो. पहिल्या गेममध्ये प्रेक्षकांच्या पाठिंब्याने ही खूप मदत केली”.

गोहवर सलग तिसरा विजय

सिंधूने या स्पर्धेच्या मागील दोन मोसमात कांस्य आणि रौप्य पदके जिंकली आहेत. गोरसेवर तिचा सलग तिसरा विजय आहे. तिला कॉमनवेल्थ गेम्समधील मिश्र सांघिक स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत गोहने कडवी झुंज दिली. जी या सामन्यातही कायम राहिली. गोहने पुन्हा एकदा आक्रमक खेळ करत भारतीय खेळाडूला थक्क केले. सिंधूने मात्र त्यानंतर बरोबरी साधत विजयाची नोंद केली. दरम्यान, दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूनं उपांत्य फेरीत सिंगापूरच्या जिया मिनचा पराभव केला.

‘मातोश्री’वर राडा, बालेकिल्यातील २ बड्या नेत्यांची उद्धव ठाकरेंसमोर भांडणं, कारण….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here