राजकारणासाठी राजकारण करण्यात काहीच अर्थ नाही. अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे प्रवक्ते उदय सामंत यांनी रोहित पवार यांच्या ट्विटवर दिली आहे. उगाचच राजकारणासाठी राजकारण करू नये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाल्यावर दिल्लीत सन्मान वाढला आहे. राष्ट्रपती शपथग्रहण सोहळ्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत पहिल्या रांगेत उभे होते ते कोणाला दिसले नाही हे दुर्देव असे प्रत्युत्तर आमदार उदय सामंत दिले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केवळ फोटो काढण्यासाठी तिकडे उभे होते. महाराष्ट्राचा मान सन्मान हा निश्चितच वाढलेला आहे त्याची प्रचिती आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कुठेही अवमान झाला असे म्हणणे चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया सामंत यांनी देत राष्ट्रवादीला उत्तर दिले आहे.
काय म्हणाले होते रोहित पवार?
देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तरीही त्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणं योग्य नाही. प्रत्येक मराठी मनाला यामुळं नक्कीच दुःख झालंय. यापुढं असं होणार नाही याची दक्षता केंद्र सरकार घेईल, असं होणार नाही याची दक्षता केंद्र सरकार घेईल, अशी अपेक्षा करूयात! रोहित पवारांनी असं ट्विट केल्यानंतर महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी यावर टीका केली. पहिलं ट्विट केलं. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनीही प्रतिक्रिया दिली.