लोणावळा : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खोपोली हद्दीत आडोशीजवळ ट्रकने ठोकरल्याने लघुशंकेसाठी उतरलेला ट्रक चालक जागीच ठार झाला.

रजनीकांत बायदड्डे (वय- 22, रा. हुमनाबाद, कर्नाटक) असे मृत्युमुखी पडलेल्या चालकाचे नाव आहे. आज (मंगळवारी) पहाटे ही घटना घडली.

महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रजनीकांत हा माल ट्रक (केए 56 डी 244) घेऊन मुंबई च्या दिशेने निघाला होता. बोरघाटात लघुशंका आल्याने ट्रक द्रुतगती मार्गावर शोल्डर लेनवर उभा करून लघुशंका उतरला होता. याचवेळी पाठीमागून भरधाव आलेल्या अन्य एका माल ट्रकच्या (केए 25 सी 9591) चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक द्रुतगती मार्गावरील लोखंडी क्रँश बँरियर तोडत रजनीकांतला ठोकरले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here