टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, २९ वर्षीय नागराज मातामारी कलबुर्गीमधील गाझीपूरचा रहिवासी होता. २९ जुलै रोजी आळंद रोडवरील भोसगा क्रॉसिंगवर त्याचा मृतदेह आढळून आला होता. सगळ्यात धक्कायाक बाब म्हणजे ओळख लपवण्यासाठी मोठ्या दगडाने त्याचं डोके ठेचण्यात आलं होतं. तपासानंतर पोलिसांनी त्याच्या बहिणी अनिता आणि मीनाक्षीला अटक केली.
एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही बहिणी अनेक वर्ष आपल्या नवऱ्यांपासून वेगळ्या राहिल्या आहेत. रिलेशनशिपच्या मुद्द्यावरून भाऊ सतत बहिणींना त्रास देत होता. त्यांच्यावर पाळत ठेवत होता. यावरून वारंवार त्यांच्यामध्ये भांडणं होत होती. या सगळ्याला वैतागून बहिणीने थेट भावाचा काटा काढला.
आरोपी बहिणींनी सुपारी देऊन भावाची हत्या केली. आरोपींनी ऑटोरिक्षात नागराजचा गळा कापला आणि त्यानंतर मृतदेह शहराच्या बाहेर फेकून दिला. ओळख लपवण्यासाठी त्याचा चेहरा दगडाने ठेचला. पोलिसांनी कपड्यांवरून मृतदेहाची ओळख पटवून त्याच्या बहिणी व इतरांना माहिती दिली. बहिणींनी सुपारी मारणाऱ्यांना केलेल्या फोन कॉलच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली.