बैतूल : गुन्ह्यांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मध्यप्रदेशच्या बैतूल जिल्ह्यात एक पुरुष गावातील महिलांसमोर त्याचे प्रायव्हेट पार्ट दाखवत असे. त्याला अनेकदा सावध करुनही तो मान्य करायला तयार नव्हता. त्यामुळे गावातील काही लोकांनी नराधमाला अशी काही शिक्षा दिली की वाचून अंगावर शहारे येतील.

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे, तर एकावर उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी रविवारी दिली. बैतूल पोलिसांनी सांगितले की, दीपचंद जिल्ह्यातील काजली गावात तो महिलेसमोर नग्नावस्थेत उभा असायचा. तसेच त्यांचा छळ करायचा, याबाबत त्याला अनेकदा ताकीद देण्यात आली होती. पण तो काही सुधारला नाही.

सगळे अडवत असतानाही तरुण बाईकवर शिरला पुराच्या पाण्यात, पुढे काय घडलं; अंगावर शहारे आणणारा VIDEO
दीपचंद गावातील महिलांसमोर त्याचे प्रायव्हेट पार्ट दाखवत असे. शनिवारीही तो महिलांसमोर नग्नावस्थेत उभा होता. यावर संतापलेल्या नागरिकांनी घटनेच्या दिवशी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने ऐकले नाही. दीपचंदच्या कृत्यांमुळे अस्वस्थ झालेल्या महिलांनी गावकऱ्यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर सुदेश आणि कृष्णा यांनी त्याच्या अंडरवेअरमध्ये पेट्रोल टाकून त्याला आग लावली. त्यामुळे त्याच्या प्रायव्हेट पार्टचा २० टक्के भाग जळाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३२४ आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशात दीपचंद हा देखील २० टक्के भाजले असून, त्याच्यावर बैतूल जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हाही दाखल केला आहे.

रक्षाबंधनापूर्वी सख्ख्या बहिणींनीच दिली भावाची सुपारी, आधी गळा चिरला नंतर दगडाने….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here