अशात मागील काही दिवसांपासून विशालचे घरात सतत वाद होत असायचे. त्यातून विशाल याने काल रात्री पावणे नऊच्या सुमारास स्वतः वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, विशाल याचे एका तरुणीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याने कुटूंबियांसोबत सतत त्याचे वाद होत असे.
या वादाला कंटाळून विशालने गोळी घालून आत्महत्या केली, अशी माहिती हडपसर पोलिसांनी दिली. मात्र, त्याच्याकडे गावठी पिस्तुल कुठून आली? हा मोठा प्रश्न आहे. पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत असून विशालच्या कुटुंबियांचीही चौकशी होणार असल्याची माहिती आहे.