या सगळ्यात आता ट्विटरवर अतुल कुलकर्णी ट्रेंड करत आहेत. नेटकऱ्यांनी त्यांचे जुने ट्वीट व्हायरल करत सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. ‘लाल सिंह चड्ढा’वर बहिष्कार घालण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. नेटकऱ्यांच्या मते अतुल यांचीही भारताबाबत तीच विचारसरणी आहे जी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची आहे. अतुल कुलकर्णी यांनी १७ जुलै २०१८ रोजी केलेल्या ट्वीटमध्ये लिहिले होते की, भारत हा राज्यांचा एक संघ आहे आणि त्याच्या स्थापनेच्या वेळी त्याची राजकीय रचना लक्षात घेऊन त्यापद्धतीने अंमलबजावणी व्हायला हवी होती.
विशेष म्हणजे लंडनमधील केंब्रिज विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात राहुल गांधी हेच म्हणाले होते. अभिनेता अतुल स्वतःला हिंदूही मानत नाही. विविध भाषांमधील अनेक चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केलेल्या या अभिनेत्याने आपण हिंदू नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी स्वतःला नास्तिक घोषित केले आहे. पुढे ते म्हणाले होते की, ‘धार्मिक संघटना नास्तिकांच्या विरोधात आहेत, असा टोला त्यांनी एकदा लगावला होता. मग तो गुन्हा ठरवण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करणार का?’
तसेच, त्यांनी एका युझरला विचारले होते की, ‘मी हिंदू आहे असं तुला का वाटतं?’ डिसेंबर २०१३ मध्ये त्यांनी हे ट्वीट केलं होतं आणि भारतातील ‘हिंदू’ हा शब्द हिंदू धर्माशी संबंधित आहे यावर विश्वास ठेवण्यासही नकार दिला होता. १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फॉरेस्ट गंप’च्या कथेचा अधिकृत रिमेकची संहिता अतुल कुलकर्णीने लिहिले आहे. ते आमिरसोबत मेधा पाटकरांच्या नम्रदा बचाओ चळवळीत सक्रिय होते. २००६ मध्ये ‘रंग दे बसंती’ चित्रपटादरम्यान आणि अतुल कुलकर्णी ‘नर्मदा बचाओ आंदोलन’मध्ये विरोध करण्यासाठी आले होते.