कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात धुवांधार पाऊस सुरू असून यामुळे संपूर्ण शहरांमध्ये पूरपरिस्थिती ओढावली आहे. सततच्या पावसामुळे अणुस्कुरा राजापूर रोड वाहतुकीसाठी बंद झाला आहे. तर करजफेंन, बुरंबाळ, काटे इथे पाणी साचलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंचगंगेसह सर्व नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने कोल्हापुरमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील २३ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. अनेक मार्ग बंद करण्यात आले असून नागरिकांना घरातच राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पन्हाळा गड पुन्हा ढासळू लागल्याचे पाहायला मिळाले. आज सोमवारी सकाळी साडे आठच्या सुमारास चार दरवाजा खालील काही भाग कोसळू लागल्याचे पाहायला मिळाले.

अनैतिक संबंध अन् गावठी बंदूक; पुण्यातल्या २५ वर्षीय तरुणाच्या आत्महत्येने पोलिसांना देखील बसला धक्का
गडाच्या नाक्याजवळ ज्या ठिकाणी गेल्यावर्षी रस्ता खचला होता. त्याच्याच उजव्या बाजूकडील एकेक दगड निसटतानाचे दिसून आले. येथील नागरिकांनी हे चित्र आपल्या कॅमेरात कैद केले असून याकडे संबंधित विभागाने तातडीने लक्ष देणे गरजेचे असल्याचे नागरिकांनी म्हंटले आहे.

हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी…

जिल्ह्याला हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढला आहे. पंचगंगेला पूर आल्याने १५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगेची पाणीपातळी सध्या २४ फुटांवर पोहोचली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असताना दुसरीकडे संरक्षक भिंत खचली आहे. यामुळे करूळ घाटातील अवजड वाहतूक थांबवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

पन्हाळ गडावर जाणाऱ्या मुख्य रस्त्याशेजारी भूस्खलन; दगड कोसळू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here