Maharashtra Cabinet Expansion: एकनाथ शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा अद्याप सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रकरणात सुप्रीम कोर्ट सातत्याने सुनावणीसाठी पुढील तारखा देत आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ रखडल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता अधिक विलंब केल्यास जनतेमध्ये नकारात्मक वातावरण निर्माण होऊ शकते.

हायलाइट्स:
- गेल्या ३९ दिवसांत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेच राज्याचा कारभार हाकत आहेत
- उद्या मंत्रिमंडळाचा छोटेखानी विस्तार होण्याची शक्यता
- विस्तारात पहिल्या टप्प्यात १६ ते १७ मंत्र्यांचा समावेश असेल
सूत्रांच्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी नव्या मंत्र्यांना शपथ दिली जाऊ शकते. त्यादृष्टीने विधिमंडळाच्या परिसरात हालचालींना सुरुवात झाली आहे. विधिमंडळ परिसरातील पोलीस बंदोबस्त अचानक वाढवण्यात आला आहे. तसेच विधिमंडळ सचिवांनी तातडीने अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या सगळ्या घटना पाहता बुधवारी सकाळी शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नंदनवन बंगल्यावरील बैठकीनंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी जाऊ शकतात. त्यावेळी हे दोघेजण राज्यपालांना मंत्रिमंडळ विस्ताराविषयी सांगतील, अशी माहिती आहे.
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे कालच दिल्लीतून परतले होते. त्यांच्या दिल्लीवारीत भाजप श्रेष्ठींकडून मंत्रिमंडळ विस्तारासाठी हिरवा कंदील मिळाल्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा अद्याप सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रकरणात सुप्रीम कोर्ट सातत्याने सुनावणीसाठी पुढील तारखा देत आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ रखडल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता अधिक विलंब केल्यास जनतेमध्ये नकारात्मक वातावरण निर्माण होऊ शकते. त्यामुळे १५ ऑगस्टपूर्वी शिंदे-फडणवीस सरकारचा छोटेखानी मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली होती.
पहिल्या टप्प्यात १६ ते १७ मंत्र्यांना शपथ?
गेल्या ३९ दिवसांत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेच राज्याचा कारभार हाकत आहेत. त्यामुळे अनेक खात्यांची कामे खोळंबली आहेत. त्यामुळे उद्या मंत्रिमंडळाचा छोटेखानी विस्तार होण्याची शक्यता आहे. विस्तारात पहिल्या टप्प्यात १६ ते १७ मंत्र्यांचा समावेश असेल, अशी चर्चा आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network