रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात सलग तीसऱ्या दिवशीही पावसाचे थैमान सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नद्यांनी धोकादायक पातळी ओलांडली आहे. जगबुडी, काजळी, शास्त्री, कोदवली, बावनदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. चांदेराई बाजारपेठ इथे पाणी आले असून खेड मटण आणि मच्छी मार्केटजवळ पाणी आले आहे.
कोकण व सातारा जिल्हा जोडणारा रघुवीर घाट दरड कोसळल्याने अद्याप ठप्प आहे. लांजाजवळ असलेल्या काजळी नदीने धोका पातळी ओलांडली असून पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गवरील वाहतूक पोलीस आणि लांजा पोलीस पथकाच्या उपस्थितीत अंजनारी पुलावरून दोन्ही बाजूने वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. लाटवण रेवतळे पुलावर पाणी आल्याने दापोली मंडणगड लाटवण महाड रस्ता बंद झाला आहे. खेड नगरपरिषदेकडुम शहरत सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. खेड प्रशासन अलर्ट मोडवर आहे. खेड दापोली मार्गाजवळ पाणी असून हा मार्गही ठप्प होण्याची शक्यता आहे. राज्यात पावसाचं थैमान! जिल्ह्यात २३ बंधारे पाण्याखाली, अनेक मार्ग वाहतूकीसाठी बंद मंडणगडलाही अपार्टमेंट पाण्यात मंडणगड भिंगळोली येथील समर्थ कृपा अपार्टमेंट येथील वसाहतीत पाणी भरले आहे. मंडणगड भिंगळोली सृष्टी अपार्टमेंट इथे पुराचे पाणी भरल्याने जनजीवन विस्कळीतमंडणगड तालुक्यात अंबवणे इथे वाहतूक बंद झाली आहे. अंबवणे गावाजवळ दरड कोसळल्याने वाहतूक बंद झाली आहे. अंबवणे वस्तीची फेरी थांबवून ठेवली होती. बांधकाम विभाग यांच्याकडून रस्ता मोकळा करण्याची कार्यवाही सुरू आहे. रघुवीर घाटामध्ये दरड कोसळल्याने वाहतूक बंद झाली आहे, असे प्रशासनाने कळवले आहे. त्यात सततच्या पावसामुळे रस्ता सुरळीत करण्यास वेळ लागणार आहे, तो कधी सुरू होईल याबाबत प्रशासनाने कळवलेले नाही.
लांज्यात दत्त मंदिर पाण्याखाली दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मुंबई-गोवा महामार्गावरील ब्रिटिश कालीन लांजा काजळी नदी पात्राबाहेर वाहत आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली तर अन्य मार्गाने देवधे पुसावे मार्ग वाहतूक वळविण्यात आले तर काजली नदीचे पाणी वस्तीत शिरले आहे. पुरस्थिती निर्माण झाल्याने सगळेच ठप्प झाले आहे. येथील श्री दत्त मंदिरही पाण्याखाली गेले आहे.