काय म्हणाले शरद पोंक्षे?
राष्ट्रपुरुष लोकमान्य टिळक लोकमान्य टिळक यांचा जन्म दापोली तालुक्यातील चिखलगाव इथं झाला आहे. या संदर्भात पोंक्षे यांनी वक्तव्य केल्यानं वादाला तोंड फुटलं आहे. लोकमान्य टिळकांचं जन्मस्थान हे काल्पनिक असल्याचा दावा पोंक्षे यांनी केलाय. रत्नागिरी शहरात ज्या घरात लोकमान्य टिळकांचा जन्म झाला, असं सांगण्यात येतं ते ठिकाण काल्पनिक असल्याचं पोंक्षे यांनी म्हटलं आहे.
पोंक्षे आणि वाद
दरम्यान, ही काही पहिली वेळ नाही की, पोंक्षे यांच्या वक्तव्यामुळं वाद निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी स्वातंत्रवीर सावकार यांच्या जीवन कथेवर आधारित पुण्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. ‘लहान मुलांना सावरकर कळले पण त्या दिल्लीतल्या ५० वर्षीय घोड्याला सावरकर कळले नाही’, असा टोला शरद पोंक्षे यांनी राहुल गांधी यांना त्यांचं नाव न घेता लगावला होता.
सावरकरप्रेमी आला म्हटलं की दहशत वाढली पाहिजे जेवढा अपमान सावरकर याचा केला तो आतापर्यंत कोणाचाच झाला नसेल. आता सावरकर यांची दहशत वाढली पाहिजे. यापुढं सावरकरप्रेमी आला म्हटलं की, दहशत वाढली पाहिजे. सावरकर यांची दहशत ब्रिटिशांना होती, काँग्रेसलापण आहे अन् ती दहशत वाढली पाहिजे, असं विधान शरद पोंक्षे यांनी केलं होतं.