Nagpur School Bus Accident : नागपूर शहरात स्कूल बसचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. स्कूल बसर स्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात पडल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातावेळी स्कूल बसमध्ये १६ विद्यार्थी देखील होते. सुदैवाने या अपघातात बसमधील विद्यार्थी थोडक्यात बचावले आहेत.

 

Nagpur School Bus Accident
विद्यार्थ्यांनी भरलेल्या स्कूल बसचा भीषण अपघात, स्टेअरिंग लॉक झाल्याने थेट पाण्याच्या डबक्यात कोसळली

हायलाइट्स:

  • नागपूरमध्ये स्कूल बसचा अपघात
  • रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात पडून बसचा अपघात
  • सुदैवाने या अपघातात प्राणहानी नाही
नागपूर : शहरात स्कूल बसचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. स्कूल बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात पडल्याची घटना उघडकीस आली आहे. या अपघातावेळी स्कूल बसमध्ये १६ विद्यार्थी देखील होते. सुदैवाने या अपघातात बसमधील विद्यार्थी थोडक्यात बचावले आहेत. बेसा घोगली मार्गावर पोदार इंटरनॅशनल स्कूल बस ही खड्ड्यात उलटली आहे. सुदैवाने या अपघातात प्राणहानी झालेली नाहीये. मात्र, दोन विद्यार्थी जखमी झाले आहेत. शहरात होणाऱ्या पावसामुळे या भागातील शाळांना सकाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

या स्कूल बसचा अपघात स्टेअरिंग लाॅक झाला असल्याची माहीती समोर आली आहे. या बसचा अपघात पाहून पालकांचा काळजाचा ठोका चुकला होता. अपघातात दोन मुलं किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. घटना घडताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.

राज्यात पावसाचं थैमान! जिल्ह्यात २३ बंधारे पाण्याखाली, अनेक मार्ग वाहतूकीसाठी बंद
सकाळी आठ-साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. जेव्हा बस कोसळली तेव्हा आम्ही लागलीच खड्ड्यात उडी घेतली. जेवढ्या मुलांना बसमधून काढता आले तेवढ्या मुलांना आम्ही काढलं. काही मुलांना बसची काच फोडून बाहेर काढलं तर दोन मुलं पाण्यात खाली दाबले गेले होते. ते जरा जखमी झाले होते. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी याच मार्गावर एक मोठा अपघात झाला होता. यात एका तरूणाचा मृत्यू देखील झाला होता, अशी माहिती देखील स्थानिक नागरिकांनी दिली.

TET Exam Scam: आता नव्या सरकारमध्ये अब्दुल सत्तार यांनाच शिक्षणमंत्री करतील: पृथ्वीराज चव्हाण

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here