radhakrishna vikhe patil leaves from shirdi: संबंधित खात्यांचे मंत्री आणि पालकमंत्र्यांची नियुक्ती न झाल्यामुळे जनतेची अनेक कामं खोळंबली आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळ विस्ताराच्या दिशेनं पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे.

कोण आहेत राधाकृष्ण विखे-पाटील?
राज्यात फडणवीस सरकार असताना विधान राधाकृष्ण विखे-पाटील विरोधी पक्षनेते होते. जून २०१९ मध्ये, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये असताना त्यांनी गृहनिर्माण, परिवहन, शिक्षण मंत्री ही पदं भूषवली आहेत. ते विधानसभेत शिर्डी मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात.
का रखडला मंत्रिमंडळ विस्तार?
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे कालच दिल्लीतून परतले होते. त्यांच्या दिल्लीवारीत भाजप श्रेष्ठींकडून मंत्रिमंडळ विस्तारासाठी हिरवा कंदील मिळाल्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा अद्याप सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रकरणात सुप्रीम कोर्ट सातत्याने सुनावणीसाठी पुढील तारखा देत आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ रखडल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता अधिक विलंब केल्यास जनतेमध्ये नकारात्मक वातावरण निर्माण होऊ शकते. त्यामुळे १५ ऑगस्टपूर्वी शिंदे-फडणवीस सरकारचा छोटेखानी मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली होती.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.