मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता या त्यांच्या खासगी आयुष्यामुळं नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या आयुष्यात आलेले चांगले-वाईट अनुभव त्यांनी अनेकदा मनमोकळेपणानं चाहत्यांसोबत शेअर केलेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी लग्न झालेल्या लग्न झालेल्या पुरुषाच्या प्रेमात न पडण्याचा सल्ला दिल्ला दिला. यासोबतच या नात्याचा शेवट नेहमी वाईटच असतो असंही त्या म्हणाल्या होत्या. आता पुन्हा एकदा त्यांनी त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तीबद्दल भाष्य केलंय. ती व्यक्ती आहे विवियन रिचर्ड्स.

नीना गुप्ता एकेकाळी वेस्ट इंडिज क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होत्या. नीना आणि विवियन यांना मसाबा ही एक मुलगी सुद्धा आहे पण या दोघांनी कधी लग्न केलं नाही. नीना यांनी सिंगल मदर होण्याचा निर्णय घेतला. पण आता विवियन रिचर्ड्स यांच्याबद्दल नीना यांच्या मनात काय भावना आहेत, याबद्दल प्रश्न विचारताच नीना यांनी खरं उत्तर दिलं.
लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थळासंदर्भात शरद पोंक्षेंचं मोठं वक्तव्य,वादाला तोंड फुटण्याची शक्यता
विवियन रिचर्ड्स यांच्याबद्दल मनात चीड आहे का , तुम्ही त्यांचा तिरस्कार करता का ? असं विचारताच नीना यांनी मन मोकळं केलं. ‘माझ्या मनात त्यांच्याविषयी काही वाईट भावना, तिरस्कार असता तर मी त्यांच्या बाळाला जन्मच दिला नसता. मी माझ्या पूर्वश्रमीच्या पतीचा किंवा एक्स बॉयफ्रेंडचा कधीही तिरस्कार केला नाही, आणि करणारही नाही’ असं नीना यांनी म्हटलं आहे.


दिरानं केली भावजयीची डिलिव्हरी…मालिकेतला तो सीन पाहून प्रेक्षक भडकले
…म्हणून केलं नाही लग्न
प्रेग्नन्सीच्या वेळी आलेले लग्नाचे प्रस्ताव आणि त्यावेळी लग्न न करता सिंगल मदर होण्याचा घेतलेला निर्णय यावर नीना यांनी भाष्य केलं. नीना म्हणाल्या, ‘मला स्वतःचा फार अभिमान होता. मी माझ्या बाळाला नाव मिळावं किंवा पैसे मिळावे यातल्या कोणत्याही गोष्टीसाठी लग्न करणार नाही हा माझा निर्णय झाला होता. मला प्रसिद्ध दिग्दर्शकानं लग्नाची मागणी घातली होती,पण मी त्याला नाही म्हटलं’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here