Cabinet expansion Maharashtra | मंत्रिमंडळ विस्तारासाठी आता जास्त काळ वाट पाहावी लागणार नाही. मंत्रिमंडळ विस्तार उद्या किंवा परवा होऊ शकतो, असे त्यांनी म्हटले. यानंतर त्यांना तुमचा मंत्रिमंडळात समावेश होणार की नाही, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर रामदास कदम यांनी सांगितले की, रामदास कदम मंत्रिमंडळात नसेल आणि विधानपरिषदेतही नसेल. त्यांच्या या वक्तव्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

हायलाइट्स:
- उद्या सकाळी राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता
- पहिल्या टप्प्यात १६ ते १७ मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता
- नंदनवन बंगल्यातून बाहेर पडल्यानंतर रामदास कदम यांना प्रसारमाध्यमांनी गराडा घातला
एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन बंगल्यातून बाहेर पडल्यानंतर रामदास कदम यांना प्रसारमाध्यमांनी गराडा घातला. यावेळी त्यांना साहजिकच मंत्रिमंडळ विस्ताराविषीय प्रश्न विचारण्यात आले. यावर रामदास कदम यांनी म्हटले की, मंत्रिमंडळ विस्तारासाठी आता जास्त काळ वाट पाहावी लागणार नाही. मंत्रिमंडळ विस्तार उद्या किंवा परवा होऊ शकतो, असे त्यांनी म्हटले. यानंतर त्यांना तुमचा मंत्रिमंडळात समावेश होणार की नाही, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर रामदास कदम यांनी सांगितले की, रामदास कदम मंत्रिमंडळात नसेल आणि विधानपरिषदेतही नसेल. त्यांच्या या वक्तव्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
यापूर्वी शिवसेनेत असताना २०१९ साली महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर रामदास कदम यांना मंत्रिपद मिळाले नव्हते. त्यांच्या पर्यावरण खात्याचा कारभार आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आला होता. यावरुन रामदास कदम यांनी अलीकडेच जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. आदित्य ठाकरे माझ्यासोबतच राहून शिकले, पण नंतर ते माझेच खाते घेतील, असे मला वाटले नव्हते. मी पर्यावरणमंत्री असताना घेतलेल्या प्लॅस्टिकबंदीसारख्या निर्णयांचे श्रेय आदित्य ठाकरे यांना देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यामुळे आता नव्या सरकारमध्ये मंत्रीपद आणि विधानपरिषदेची आमदारकी, अशा दोन्ही गोष्टी नाकारताना एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी रामदास कदम यांची समजूत नक्की कशी काढली असावी, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र, मंत्रिमंडळ किंवा आमदारकीऐवजी रामदास कदम यांना अन्यत्र कुठे सामावून घेतले जाणार का, हे आगामी काळात पाहावे लागेल.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network