यावेळी त्यांनी आजवर या सिनेमाबाबत प्रेक्षकांना माहीत नसणाऱ्या गोष्टींबाबत भाष्य केले आहे. त्यातील महत्त्वाची बाब म्हणजे या चित्रपटात आजच्या घडीच्या दिग्गज कलाकारांना परदेसमध्ये काम करण्याची इच्छा होती. जी भूमिका अपूर्व अग्निहोत्री याने साकारली होती ती सलमान खानला करण्याची इच्छा होती असं घई म्हणतात. तर महिमा चौधरी हिने साकारलेली भूमिका ही माधुरी दिक्षित साकारणार होती. पण नेमकं असं काय घडलं की या चित्रपटासाठी घई यांनी सलमानच्या ऐवजी अपूर्व अग्निहोत्रीला आणि माधुरीच्या ऐवजी महिमा चौधरीला निवडले?
हे वाचा-ना डायलॉग्ज ना काय घडलं ते आठवतंय; ब्रेकअप झाल्याने अशी होती प्राजक्ताची अवस्था
‘परदेस’, ‘राम लखन’, ‘हीरो’, ‘कर्ज’, ‘ताल’, ‘अपना सपना मनी मनी’, ‘कर्मा’ आणि ‘ओम शांति ओम’ सारख्या उत्तमोत्तम चित्रपटांची रसिकांना मेजवानी देणाऱ्या सुभाष घई यांनी ‘परदेस’साठी कलाकार कसे निवडले याबाबत माहिती दिली आहे. ‘लेखक आणि दिग्दर्शक या नात्याने माझा पहिला फोकस व्यक्तिरेखेवर असतो’, असे घई म्हणतात.
त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की, ‘या व्यक्तिरेखा कहाणी उत्तम पद्धतीने मांडतात. चांगली कथा लिहिणे अवघड असते. त्याहूनही अवघड असते पटकथा लिहिणे आणि त्याहूनही कठीण असते व्यक्तिरेखेत रंग भरणे. मी कधीही कलाकाराला नजरेसमोर ठेवून व्यक्तिरेखा तयार केली नाही. कथा लिहिण्याचा एक नियम असतो, की पहिल्यांदा व्यक्तिरेखा आणि तिची कथा लिहिली पाहिजे त्यानंतर त्यासाठी कलाकार निवडला पाहिजे. मी कधीही कलाकार पाहून व्यक्तिरेखा लिहिली नाही.’
हे वाचा-अतुल कुलकर्णीला सोशल मीडियावर केलं गेलं ट्रोल; म्हणाले ‘या हिंदूची लाज वाटते’
घई यांनी या सिनेमातील पात्रांविषयी बोलताना असे म्हटले आहे की, ‘अर्जुन सागर याची भूमिका शाहरूख खानने साकारली होती. मी जेव्हा शाहरूखला या भूमिकेसाठी बोलावले तेव्हा त्याला मी एकच गोष्ट सांगितली की, तुला या चित्रपटात शाहरूख म्हणून उतरायचे नाही. त्यावेळी शाहरूखचा ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हा चित्रपट हिट झाला होता. शाहरूखची रोमँटीक भूमिका सगळ्यांनाच आवडली होती. मी म्हणालो, ‘जेव्हा तू स्क्रीनवर एखाद्या तरुणीकडे पाहतोस तेव्हा तुला पाहून असे वाटते की तुझे तिच्यावर प्रेम जडले आहे. मात्र माझ्या कथेमध्ये तुझे पात्र असे आहे ज्याला त्याच्या प्रेमाची भावना शेवटपर्यंत मनातच दडवून ठेवावी लागत असते. असे झाले नाही तर माझी संपूर्ण कथा व्यर्थ जाईल.’
घई यांनी सांगितले आहे, की त्यांनी शाहरूखला या चित्रपटात जीन्स पँटऐवजी फॉर्मल पँट घालण्याचा सल्ला दिला होता. यासारख्या छोट्या छोट्या गोष्टींमुळेच शाहरूखची या चित्रपटातील कामगिरी ही त्याच्या इतर सगळ्या चित्रपटांपेक्षा वेगळी राहिली असे घई सांगतात.
या चित्रपटातील ‘कुसूम’ या व्यक्तिरेखेसाठी आधी माधुरी दीक्षित हिची निवड करण्यात आली होती. माधुरीला या चित्रपटाची कथाही आवडली होती. घई यांच्यासोबत काम करणाऱ्या सगळ्या टीमची इच्छा होती की ही भूमिका माधुरीलाच मिळावी. मात्र घई यांनी महिमा चौधरीची निवड केली.
हे वाचा-‘विकृती थांबायला हवी’; रीलमध्ये डोळा मारल्याने ट्रोल करणाऱ्यांवर भडकल्या ऐश्वर्या नारकर
घई म्हणतात, की या चित्रपटाच्या वेळी माधुरी दिक्षित खूप मोठी स्टार बनली होती. चित्रपटात ‘कुसूम’ ची व्यक्तिरेखा होती अमेरिकेतील मुलाशी लग्न व्हावे ही इच्छा असलेल्या, लहानशा खेड्यातल्या तरुणीची. घई यांनी म्हटलंय की, महिमाचे डोळे खूप सुंदर आहेत. ती मध्यम उंचीची असून अगदी खळखळून हसते. या तीन गोष्टींमुळे ही भूमिका महिमाला मिळाली. महिमाने या चित्रपटासाठी बरीच मेहनत घेतली आणि तिला या चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला, अशी आठवण घई यांनी सांगितली आहे.
या चित्रटातील गाणीदेखील प्रचंड लोकप्रिय झाली होती. सगळ्यात सुपरहिट गाणं होतं ते म्हणजे, ‘दो दिल मिल रहे हैं, मगर चुपके-चुपके..’ शिवाय ‘आय लव माय इंडिया’ हे गाणं आजही ऐकलं-ऐकवलं जातं. याशिवाय, ‘जहाँ पिया, वहाँ मैं’ आणि ‘मेरी मेहबूबा’ ही गाणीही रसिकांच्या ओठांवर रुळली होती. 8 ऑगस्ट 1997 साली प्रसिद्ध झालेला ‘परदेस’ रोमांस, ड्रामा, अॅक्शन आणि देशभक्ती या सगळ्याचे उत्तम मिश्रण असलेला चित्रपट होता. यात शाहरूख खान, महिमा चौधरी आणि अपूर्व अग्निहोत्री यांच्याव्यतिरिक्त अमरीश पुरी, आलोक नाथ, दीना पाठक, हिमानी शिवपुरी आणि आदित्य नारायण यांच्याही महत्वाच्या भूमिका होत्या