चार वर्षापासून एकमेकांवर असणाऱ्या प्रेमाचे रूपांतर लग्न बंधनात होईल, असे स्वप्न प्रेयसीने पाहिले. हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी लग्न करण्याचेही ठरले. मात्र ऐनवेळी प्रियकरच लग्न मंडपातून पळून गेला. हे कमी म्हणून की काय, मुलाच्या मामाने मुलीला विषारी पेढा खाऊ घातल्याचा धक्कादायक प्रकार पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याच्या राजवडी येथे घडला.

दुसऱ्या दिवशी तरुणीचे आईवडील व प्रियकराचे मामा व मावस भाऊ हे राजवडी येथे एकत्र बसून चर्चा करत असताना मुलाचा मामा अकुंश गलांडे हा त्या तरुणीजवळ आला. तिला बाजूला घेऊन ‘झालेला प्रकार हा खूप वाईट होता. आपण याच्यातून काहीतरी मार्ग काढू’ असे म्हणाले. हा देवाचा पेढा आहे. हा पेढा खाल्ल्यानंतर सर्व काही चांगले होईल असे म्हणून सर्वांसमक्ष गलांडे यांनी तरुणीला पेढा खायला लावला आणि ते सर्व घरी आले.
तरुणीचे आई, वडील शेतात गेल्यानंतर तिला चक्कर येवून उलट्या होवू लागल्या. त्या रात्री नऊ वाजता तिला उपचारासाठी इंदापूरातील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. ४ ऑगस्टपर्यंत तिला शुद्ध नव्हती. तिने विषारी औषध घेतले होते का अशी शंका तिच्या आईला आली. मात्र तिने नकार दिला. हर्षलच्या मामाने पेढा खायला दिल्यानंतर आपल्याला त्रास झाल्याचे तिने सांगितले. त्यानंतर तिने वरील चौघा विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील अधिक तपास करत आहेत.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.